Kolhapur Crime: पत्नीकडे अनैतिक संबंधाची मागणी, लिंबू उतरण्याच्या बहाण्याने मेंडपाळाची हत्या; एकास अटक

यातून माळाप्पा आणि देवाप्पा यांच्यात वादही निर्माण झाला होता. हा वाद काही काळासाठी मिटलाही होता. मात्र, सावकार देबाजी याने पुन्हा माळाप्पा याच्या पत्नीकडे अनैतिक संबंधासाठी तगादा लावला.

(File Image)

पत्नीकडे विवाहबाह्य संबंधासाठी (Extramarital Affair) तगादा लावणाऱ्या हत्या (Kolhapur Crime) केल्या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) एकास अटक केली आहे. माळाप्पा कयप्पा हेगण्णावार (वय 25, रा. हेगण्णावार कोडी, नागराळे, ता. चिकोडी, जि. बेळगाव) असे अटक झालेल्या तर सावकार कलाप्पा देबाजी (वय 35) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. माळाप्पा कयप्पा हेगण्णवार हा स्थानिक भागात मांत्रिक म्हणून ओळखला जातो. तर सावकार देबाजी हा मेंडपाळ आहे. पाठिमागील काही दिवसांपासून सावकार देबाजी हा माळाप्पाच्या पत्नीकडे अनैतिक संबंधाची मागणी करत होता. या संबंधांसाठी तो तिला सातत्याने तगादा लावत असे, अशी प्राथमिक माहिती आहे.

पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सावकार कलाप्पा देबाजी हा आपल्या पत्नीकडे शरीरसुखासाठी सातत्याने मागणी करत असल्याचे माळाप्पाच्या कानावर आले होते. यातून माळाप्पा आणि देवाप्पा यांच्यात वादही निर्माण झाला होता. हा वाद काही काळासाठी मिटलाही होता. मात्र, सावकार देबाजी याने पुन्हा माळाप्पा याच्या पत्नीकडे अनैतिक संबंधासाठी तगादा लावला. त्यातून चिडलेल्या माळाप्पा याने सावकार देबाजी याला लिंबू उतरुण टाकण्यासाठी बोलावून घेतले. त्याचे हात पाय बांधले आणि त्याची हत्या केली. (हेही वाचा, Heart Blockage Pune: नवऱ्याच्या टोमण्यांमुळे हृदयात ब्लॉकेज, महिलेच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांकडून 6 जणांविरोधात गुन्हा दाखल)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असलेल्या मजरेवाडी येथे घडली. मजरेवाडी-कुरुंदवाड रस्त्यावर असलेल्या बीपीडी कॉलेज इमारतीजवळ एक बेवारस मृतदेह शेतातील झडपात आढळून आला होता. पोलिसांना सुरुवातीला या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. मात्र, पोलिसांनी तपास करत 24 तासात या प्रकरणाचा छडा लावला. या प्रकरणात माळाप्पा कयप्पा हेगण्णावार याला संशयावरुन अटक केली.

विवाहबाह्य संबंध म्हणजे दोन लोकांमधील रोमँटिक किंवा लैंगिक संबंध. ज्यापैकी किमान एकाने दुसऱ्याशी लग्न केले आहे. तरीसुद्धा तो इतर कोणा व्यक्तीच्या प्रेमात अधवा संबंध आहे. अशा प्रकारचे संबंध हे वैवाहिक शपथेचे उल्लंघन मानले जातात.तसेच जीवनाच्या जोडीदाराच्या आणि भागीदारांच्या एकमेकांवर असलेल्या विश्वासाचे उल्लंघनही मानले जाते. विवाहबाह्य संबंधांचा संबंधित व्यक्तीच्या कुटुंबांवर आणि समुदायांवर घातक परिणाम होऊ शकतो. ते भावनिक वेदना, अपराधीपणा आणि लाज निर्माण करू शकतात आणि विवाह आणि कुटुंबे तुटण्यास कारणीभूत ठरू शकतात.

काही संस्कृती आणि समाजांमध्ये, विवाहबाह्य संबंधांना अनैतिक मानले जाते. त्यामुळे घटस्फोट आणि विभक्ततेसह कायदेशीर परिणाम होऊ शकतात. सामाजिक प्रतिष्ठा आणि आदर गमावू शकतात. तथापि, काही संस्कृतींमध्ये, विवाहबाह्य संबंधांना अधिक स्वीकारले जाऊ शकते किंवा प्रोत्साहन दिले जाऊ शकते.