Kolhapur Crime: बापाला शौचालयात जिवंत जाळण्याचा प्रयत्न, मुलगा आणि सुनेचे कृत्य; कोल्हापूर येथील घटना

कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील कागल (Kagal) तालुक्यातील व्हन्नूर (Vannur) येथे ही धक्कादायक घटना घडली.

Burn | (PC - pixabay)

मालमत्तेवरुन पेटलेला वाद (Property Disputes) इतका टोकाला गेला की, लेक आणि सुनेने मिळून बापालाच जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील कागल (Kagal) तालुक्यातील व्हन्नूर (Vannur) येथे ही धक्कादायक घटना घडली. वडील सकाळच्या प्रहरी शौचालयात शौचास गेल्यावर बाहेरुन रॉकेल टाकून लेक-सून असलेल्या पती पत्नीने त्यांना पेटवून दिले. या घटनेत वडील गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

देवबा हजारे असे पीडित वडिलांचे नाव आहे. ते आपला मुलगा शिवाजी आणि सून सरला यांच्यासोबत व्हन्नूर गावात राहतात. पाठीमागील काही काळापासून बाप-लेकांमध्ये मालमत्तेवरुन वाद होता. अनेकदा हा वाद सामोपचाराने मिटविण्याचा प्रयत्न झाला. परंतू, पुढे हा वाद अधिकच विकोपाला गेला. त्यामुळे पाठिमागील काही दिवसांपासून मुलगा शिवाजी आणि सून सरला हे देवबा हजारे यांच्याबद्दल मनात राग ठेऊन होते. अखेर सकाळच्या प्रहरी देवबा हे शौचालयात शौचासाठी गेले असता पाळत ठेऊन असलेल्या शिवाजी आणि सरला यांनी ही संधी साधली. शौचालयात बाहेरुन रॉकेल ओतले आणि काडी ओढली. क्षत्रणात रॉकेलचा भडका उडाला. शौचालयात असलेल्या देवबा हजारे यांना काहीच करता आले नाही. क्षणात रॉकेलच भडका उडाला. ते गंभीर जखमी झाले. कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (हेही वाचा, Crime: बंगळूरूमध्ये गोबी मंचुरियनवरून केली आजीची हत्या; 6 वर्षानंतर कोल्हापूर येथे लपून बसलेल्या नातवाला अटक)

कागल पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, केवळ संंपत्तीच्या वादावरुन बापाला जिवंत जाळणाऱ्य मुलगा आणि सूनेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवबा हजारे यांच्यावर कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संपत्तीच्या वादातून वडिलांनाच जिवंत जाळ्याच्या घटनेमुळे परिसरात आश्चर्य आणि भीतीचे वातावरण आहे.