Kolhapur Bus Accident: गोवा-मुंबई खाजगी बस राधानगरी रोड वर उलटली; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

बसमधून 16 जण प्रवास करत होते.

Accident (PC - File Photo)

कोल्हापुर (Kolhapur) शहाराजवळील पुईखडी (Puikhadi) येथे मध्यरात्री खासगी बस उलटून अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये एकच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूरापूरात राधानगरी रोडवर अपघातग्रस्त झालेली बस VRL कंपनीची होती. या बस अपघातामध्ये मृत पावलेले तीन प्रवासी पुण्याचे होते.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, मृतांची नावं नीलू गौतम (43), रिधिमा गौतम(17), सार्थक गौतम (13) आहेत. बसमधून 16 जण प्रवास करत होते. त्यापैकी या तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचं वृत्त मिळताच फायर ब्रिगेडचं पथक घटनास्थळी दाखल झालं त्यांनी उर्वरित प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आहे. 2 जण किरकोळ जखमी झाले आहेत. नक्की वाचा: Pune Accident: पुणे महामार्गावर भीषण अपघात, चार वाहनांचा धडकेत दोघांचा मृत्यू .

गोवा-मुंबई कोल्हापूर मार्गे निघालेली ही बस रात्री 8 च्या सुमारास निघाली. मध्यरात्री 2 च्या सुमारास कोल्हापूरात बस आली असताना पुईखडी येथे उलटली. मुंबई कडे जाणार्‍या मार्गावर दोन धोकादायक वळणं आहेत. त्यापैकी एकावर बसचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. रात्रीच्या वेळेस चालकाच्या डोळ्यावर झोपेची झापड आल्यानंतर हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif