कोल्हापूर: सोशल मीडिया वर व्हिडीओ पाहून कापड व्यापाऱ्याने बनवल्या 97 हजाराच्या बनावटी नोटा; पोलिसांकडून रंगेहाथ अटक
राहुल नेसरी (Rahul Nesari) असे या आरोपीचे नाव असून त्याचा कापड व्यापार आहे
इचलकरंजी (Ichalkaranji) येथील शिवाजीनगर पोलीसांनी (Shivajinagar Police) गडहिंग्लज येथून बनावटी नोटांचा वापर करणाऱ्या एकाला अटक केल्याचे समजत आहे. राहुल नेसरी (Rahul Nesari) असे या आरोपीचे नाव असून त्याचा कापड व्यापार आहे. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करून राहुल यांच्याकडून 97 रुपये किमतीच्या बनावटी नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी तपासातून समोर आलेल्या माहितीत बनावटी नोटा बनवणारी ही एक मोठी टोळी असून सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून त्यांनी या नकली नोटा बनवण्याची सुरुवात केल्याचे समोर आले आहे. संबंधित नोटा या इचलकरंजी येथील बाजारात खपवण्याचा या टोळीचा प्रयत्न होता मात्र याविषयी अगोदरच महिती मिळाल्याने स्थानिक पोलिसांनी सापळा रचून या गुन्हेगाराला रंगेहाथ पकडले आहे.
दोन बायकांचा खर्च भागवण्यासाठी नवऱ्याने छापल्या तब्बल पाच लाखांच्या बनावट नोटा; पोलिसांकडून अटक
सकाळ ने दिलेल्या वृत्तानुसार, विधानसभा निवडणूक आणि लागूनच आलेल्या दिवाळसणात बाजरात काही बनवता नोटांचा प्रसार पाहायला मिळाला होता, यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कसू तपासणी सुरु केली होती. या तपासात पोलिसांना 17 ऑक्टोबर रोजी तीन गुन्हेगारांना पकडण्यात यश आले होते. या आरोपींकडून तब्बल 1 0लाख किमतीच्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. यानंतर अलीकडेच पोलिसांना इचलकरंजीत नेसरी या कापड व्यापाऱ्याकडूनही खोट्या नोटा वापरल्या गेल्याची माहिती मिळाली याचा शोध घेण्यासाठी रचलेल्या सापळ्यात राहुल अडकला आणि पोलिसांनी त्याच्या कडून 97 हजार 800 रुपयांच्या खोट्या नोटा पकडण्यात पून्हा यश आले.
दरम्यान, या प्रकरणी राहुल याने दिलेल्या जबाबांनुसार, या नोटा बाजारात खपणारी मोठी टोळी कार्यरत असून राहुल फक्त त्यातील एक भाग आहे, या टोळीनेच आपल्याला या नोटा पसरवण्यास लावले होते असेही राहुल याने सांगितले आहे. या प्रकरणातील तपास अद्याप सुरु असून या टोळीचा शोध पोलीस घेत आहेत. संबंधित गुन्हेगारांवर अर्थव्यवस्थेला धक्का पोहचवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्यास कठोर कारवाई होऊ शकते.