Kolhapur News: गर्लफ्रेंडने प्रियकराला मध्यरात्री घरी एकांतात बोलावले, पण घात झाला; कुटुंबीय परतले, पुढे नको ते घडले
वयाची अवघी 18 वर्षेही पूर्ण न केलेले हे दोघेही एकमेकांच्या भेटीसाठी अतूर आणि तितकेच कासावीस. अशात एक संधी मिळाली. गर्लफ्रेंडच्या घरचे काही कामानिमित्त बाहेर गेलेले. गर्लफ्रेंडने मौका साधला. घरी कुणीच नाही आणि ते लवकर परतणारही नाहीत. ही संधी साथून तिने प्रियकरला घरी बोलावले. मध्यरात्रीच्या एकांतात भेटण्यासाठी. मिठीत विसावण्यासाठी. नेमका इथेच घात झाला.
गर्लफ्रेंड (Girlfriend) आणि बॉयफ्रेंड (Boyfriend). अर्थातच प्रियकर, प्रेयसी. दोघेही अल्पवयीन. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यतील भुदरगड (Bhudargad) तालुक्यात पाचर्डे येथील राहणारे. किशोरवयीन असलेल्या या दोघांचे नुकताच एकमेकांवर जीव जडलेला. वयाची अवघी 18 वर्षेही पूर्ण न केलेले हे दोघेही एकमेकांच्या भेटीसाठी अतूर आणि तितकेच कासावीस. अशात एक संधी मिळाली. गर्लफ्रेंडच्या घरचे काही कामानिमित्त बाहेर गेलेले. गर्लफ्रेंडने मौका साधला. घरी कुणीच नाही आणि ते लवकर परतणारही नाहीत. ही संधी साथून तिने प्रियकरला घरी बोलावले. मध्यरात्रीच्या एकांतात भेटण्यासाठी. मिठीत विसावण्यासाठी. नेमका इथेच घात झाला.
प्रेयसीचा म्हणजेच त्याच्या गर्लफ्रेंडचा संदेश त्याला मिळाला. रात्र चढू लागताच त्याची पावले तिच्या घराकडे वळली. आजूबाजूला अंधार. रातकीड्यांची किर्र.. आणि वाऱ्याच्या झुळुकेसोबत उडणारा पाचोल्याचा आवाज. इतकीच काय ती सोबत. तो प्रेयसीच्या घरी पोहोचला. एकटाच. त्याने अंदाज घेतला. प्रेयसीला इशारा केला. प्रेयसीने कानोसा घेतला. घराच्या फाटकाचे दार उघडले. घरी कोणीच नसल्याने कोणी हटकण्याचा आणि रोखण्याचा सवालच नव्हता.
दोघेही बेधूंद.. एकमेकांच्या मिठीत विसावलेले. घरासमोरच्या झाडाखाली. अंधाऱ्या रात्री.. एकमेकांसोबत झाडाखाली प्रणयलीलेत मग्न. इतक्यात अनपेक्षीत घटना घडली. प्रेयसीच्या घरचे परतले. ते परतणारच होते. पण ते इतक्या लवकर परततील याची दोघांनाही कल्पना नव्हती. खरे म्हणजे तिला. घरातले परतले. पाहतात काय? घरची..आपली मुलगी. ..आणि परका कोणीतही मुलगा. दोघेही एकमेकांसोबत. तेही अशा स्थितीत.. इतक्या रात्री. (हेही वाचा, Extramarital Affair: विवाहितेचा प्रियकरासोबत गळफास, दोरी तुटली म्हणून महिला वाचली, एकाच मृत्यू)
घरातल्यांचे मस्तकच फिरले. त्यांनी दोघांनीह पकडले. ती तर घरचीच होती. पण, त्याचे काय. त्याला तिच्या कुटुंबीयांनी पकडले. त्याच्या हाताला दोरी बांधून झाडाला बांधले. तो घाबरला. काहीसा बिथरला. काय करावे कळत नव्हते. अशाच स्थितीत त्याने दोरीला जोराचा हिसडा दिला आणि पळाला. काहीच क्षणात कुटुंबीयांच्या लक्षात आले. अरे धरा.. पळाला.. पळाला. पळतो कुठे... थांब.. पाहतो.. अशा शब्दांसह पाटलाग सुरु झाला. पण..
अंधाऱ्या रात्री पावले पडतील तिकडे दिशाहीन धावणारा तो. घाबरलेला.. थरथर कापत वेगाने पावले टाकत धावणारा. त्याल कुठे माहित होते रस्ता कुठे जातो आहे. आपण रस्त्यावर आहोत की नाही. तो फक्त पायाखालची जमीन कापत राहीला. अंधाराच्या साक्षीने. फक्त पाठीमागून येणारे आवाज ऐकत. इथेच घात झाला. समोर विहीर आहे. त्यालाकळचेच नाही. धावता धावता तो चक्क विहिरीत पडला. विहीर पाण्याने तुडंब. आगोदरच अंधार.. त्यात घशाला कोरड आणि हातापायाला कंप. काय होते आहे हे कळण्याच्या आधीच. तो विहीरीत पडला. नाका तोंडात पाणी शिरले. तो पाण्यात बुडाला आणि गतप्राण झाला. एका मिठीतून सुरु झालेला त्याचा प्रवास असा करुणरित्या संपला.
सदर घटना कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाचर्डे गावात घडली. शुभंकर संजय कांबळे (वय 17 वर्षे) असे पीडिताचे नाव आहे. तो मुळचा वाकीघोल (ता. राधानगरी, जि.कोल्हापूर) येथील राहणार आहे. भुदरगड पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)