कोल्हापूर: PUBG खेळाच्या अहारी गेल्याने महाविद्यालयीन तरूणाचं बिघडलं मानसिक स्वास्थ्य; उपचार अर्धवट सोडत हॉस्पिटल मधूनही काढला पळ
अहोरात्र केवळ मोबाईलवर पबजी खेळणार्या मुलाचं मानसिक संतुलन बिघडल्याची बाब समोर आली आहे. इंद्रजित कोळी (Indrajeet Koli) असं या तरूणाचं नाव असून तो 20 वर्षीय आहे.
दिवसेंदिवस पबजी (PUBG) या मोबाईल खेळाचं वेड तरूणाईच्या डोक्यावर वाढत आहे. केवळ शहरी नव्हे तर ग्रामीण भागातही कॉलेजवयीन मुलं दिवस रात्र या खेळाच्या नादात असतात. नुकतेच कोल्हापूर शहरामध्ये PUBG खेळाचं व्यसन एका तरूणाच्या जीवावर बेतण्याची स्थिती येऊन ठेपली आहे. अहोरात्र केवळ मोबाईलवर पबजी खेळणार्या मुलाचं मानसिक संतुलन बिघडल्याची बाब समोर आली आहे. इंद्रजित कोळी (Indrajeet Koli) असं या तरूणाचं नाव असून तो 20 वर्षीय आहे. अचानक घरात आरडाओरडा करायला लागल्याने त्याच्या पालकांनी इंद्रजितला नजीकच्या रूग्णालयात दाखल केले. PUBG Mobile Season 9 आजपासून झालं उपलब्द; Royale Pass मुळे युजर्सना मिळणार भन्नाट फीचर्स
सातत्याने पबजी खेळणारा इंद्रजीत कोळी हा खेळाच्या नादात एकलकोंडा झाला होता. तो फारसा कोणाशी बोलत नसे. जर त्याच्या हातामधून मोबाईल काढून घेतला तर तो आरडाओरडा करत असे, वाद घालत असे. अशाच काल अचानक आरडा ओरडा करायला सुरूवात केल्यानंतर त्याला कोल्हापूरच्या सीपीर रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र रूग्णालयातही गोंधळ घालणार्या इंद्रजीतचा एक व्हिडिओ काल शहरात व्हायरल झाला आहे. सोशलमीडिया आणि व्हॉट्सअॅपचा त्याचा व्हिडिओ झपाट्याने पसरला आहे.
सीपीआर रूग्णालयात इंद्रजीतला दाखल करण्यात आले मात्र तो काही तासातच वाद घालून निघून गेला. मीडीया रिपोर्ट्सनुसार इंद्रजीत तणावग्रस्त स्थितीमध्ये आहे. त्याच्यावर वेळीच मानसोपचारतज्ञ आणि वैद्यकीय उपचारांची गरज आहे.