Kokan Weather Forecast For Tomorrow: कोकणचे उद्याचे हवामान कसे? पहा हवामान अंदाज!
कोकण मध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. हवामान विभागाने कोकण किनारपट्टीला वादळी पावसाचा इशारा दिला आहे.
Kokan Weather Prediction, June 27: यंदाच्या वर्षी नैऋत्य मान्सून वारे वेळेआधीच देशात आणि राज्यात दाखल झाले.कोकणसंदर्भात हवामान खात्याने एक महत्वाची अपडेट दिली आहे. कोकण मध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. हवामान विभागाने कोकण किनारपट्टीला वादळी पावसाचा इशारा दिला आहे. कोकणात गेल्या 2 -3 दिवसान पासून मुसळधार पाऊस चालू आहे व हवामान आज विभागाच्या अंदाजानुसार, 40 ते 50 किलोमीटर प्रति वेगाने वादळी वारे वाहत असून गडगडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे.याशिवाय विभागाने रायगड आणि रत्नागिरी परिसरात गेल्या दोन दिवसण पासून पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दोन्ही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस (64.65 ते 115..55 मिमी) अपेक्षित आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंगाद आहे. यादरम्यान, ताशी 40-50 किमी वेगानं वारे वाहण्याचा इशारा हवामान विभागानं देत नागरिकांना सतर्क केलं आहे.हेही वाचा: Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या पावसाचा अंदाज!
महाराष्ट्र ते कर्नाटक आणि केरळच्या उत्तरेकडील भागात वाऱ्याच्या मध्यम दबावाची रेषा तयार झाली आहे. त्यामुळे उत्तरेकडून जोरदार वारे वाहू लागले आहेत. तर यामुळेच अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. मुंबईत पुढचे दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान ढगाळ राहणार आहे, तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 आणि 26 अंश सेल्सियस इतकं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी पेरणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, अनेक भागात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. त्या भागात चांगल्या पावसाची गरज आहे. शेतकरी पावसाची प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी कर नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.