Kokan Weather Forecast for Tomorrow: कोकणात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
सोबतच हवामान खात्याने कोकणात आज यल्लो अलर्ट जारी केला आहे. पावसाच्या जोर जारी कोकणात कमी झाला असला तरी मात्र कोकण घाट माथ्यावर आज तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Kokan Weather Prediction, July 31: कोकणात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोबतच हवामान खात्याने कोकणात आज यल्लो अलर्ट जारी केला आहे. पावसाच्या जोर जारी कोकणात कमी झाला असला तरी मात्र कोकण घाट माथ्यावर आज तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्ण राज्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे नदी, नाले,व धरण तुडुंब भरले आहेत. धरणात ही हवा तेवढा पाणीसाठा झाला आहे त्यामुळे लोकांची पाण्याची चिंता मिटली आहे. चांगला पाऊस पडल्यामुळे बळीराजा देखील खुश आहे. कोकणात घाट माथ्यावर पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊसची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. गुरुवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आता कोकणात उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान खात्याने कोकणात उद्याचे हवामान याचा अंदाज लावला आहे. हेही वाचा: Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
कोकणात उद्याचे हवामान कसे?
आसाम, ओडिशा, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागात गडगडाटी वादळांसह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुजरातच्या काही भागांमध्ये अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.उर्वरित ईशान्य भारत, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, या भागात गडगडाटी वादळांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.हवामान विभागाच्या अंदाजपत्रानुसार यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.