SRA Flats Scam प्रकरणी दादर पोलिस स्थानकामध्ये Kishori Pednekar हजर; काही दिवसांपूर्वी आला होता समन्स

झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मिळाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सदनिका किशोरी पेडणेकर यांनी हस्तगत केल्याचा किरीट सौमय्यांचा आरोप आहे.

SRA Flats Scam प्रकरणी आज (1 नोव्हेंबर) मुंबईच्या माजी महापौर आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दादर पोलिस स्टेशन (Dadar Police Station) मध्ये हजेरी लावली आहे. किशोरी पेडणेकर यांना काही दिवसांपूर्वी त्याबाबतचा समंस बजावण्यात आला होता. त्यानुसार आज त्या पोलिसांसमोर हजर झाल्या आहेत.

दरम्यान भाजपा नेते किरीट सौमय्या यांच्याकडून किशोरी पेडणेकर यांच्यावर मागील काही दिवसांत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मिळाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सदनिका किशोरी पेडणेकर यांनी हस्तगत केल्या आहेत असा त्यांचा आरोप आहे. तर पेडणेकरांनी हे आरोप धादांत खोटे असल्याचं म्हटलं आहे. दोन वर्षांपूर्वी सर्व माहिती दिलेली असतानाही किरीट सोमय्या वारंवार तीच कागदपत्रं दाखवून आरोप करत असल्याचंही त्या म्हणाल्या आहे.

किशोरी पेडणेकर यांचं स्पष्टीकरण

किशोरी पेडणेकर यांनी या आरोप-प्रत्यारोपाच्या तणावामधून आपल्याला सासूबाईंनाही गमावल्याचं म्हटलं आहे. 31 ऑक्टोबर दिवशी किशोरी पेडणेकर यांच्या सासूबाईंचं निधन झालं आहे. सतत येणार्‍या उलट सुलट बातम्यांचा सासूबाईंच्या तब्येतील कळत नकळत परिणाम झाला असावा. त्यांचं वयही झालं होतं पण त्यांचं अचानक लक्षणं नसताना त्यांंचं जाणं यामागे या प्रकरणाचा त्रास होता असेही त्या मीडीयाशी बोलताना म्हणाल्या आहेत. दरम्यान येत्या काही दिवसात किशोरी पेडणेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील भेट घेऊन बोलणार असल्याचं वृत्त समोर आले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif