मुंबई: Sex करण्यासाठी अल्पवयीन मुलावर दबाव, महिलेला अटक; कुर्ला येथील घटना

पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील अल्पवयीन मुलगा हा 29 जून रोजी सकाळी नाष्टा करण्यासाठी घरातून बाहेर पडला. मात्र, सध्याकाळ झाली तरी तो घरी परतलाच नव्हता.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

मुंबई: कुर्ला (Kurla) पोलीसांनी एका 38 वर्षीय विवाहीत महिलेला अटक केली आहे. एका 16 वर्षीय मुलावर सेक्स (Sex) करण्यासाठी दबाव टाकल्याचा आणि त्याच उद्देशाने त्याचे अपहरण (Kidnapping) केल्याचा या महिलेवर आरोप आहे. कुर्ला पोलीसांनी ही कारवाई बुधवारी केली. पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील अल्पवयीन मुलगा हा 29 जून रोजी सकाळी नाष्टा करण्यासाठी घरातून बाहेर पडला. मात्र, सध्याकाळ झाली तरी तो घरी परतलाच नव्हता.

तब्बल एक महिन्यानंतर मुलाच्या वडीलांनी नेहरु नगर पोलीस स्टेशनमध्ये मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे. आलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करत पोलीसांनी तपास सुरु केला. या तपासाच आढळून आले की बेपत्ता असलेला मुलगा हा अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेच्या संपर्कात होता. गेली तीन महिने ते एकमेकांच्या संपर्कात असत.

धक्कादायक असे की, 29 जून रोजी अटक करण्यात आलेल्या महिलेच्या पतीने, त्याच्या आईने आणि आणखी चार लोकांनी ती हरवल्याची तक्रार त्याच पोलीस स्टेशनमध्ये (नेहरु नगर पोलीस स्टेशन) केली होती. ज्या पोलीस स्टेशनमध्ये अपहरण झाल्याचा आरोप करत अल्पवयीन मुलाच्या वडीलांनी तक्रार दिली होती. पोलीस दोन्ही प्रकरणांचा तपास करत होते. दरम्यान, पोलीसांना खबर लागली की, बेपत्ता महिला (आरोपी) कुर्ला रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या रेल्वे मार्गाशेजारच्या झोपडपट्टीत त्या मुलासमवेत राहते. पोलीसांनी दोघांनाही अटक केली.

पोलीसांच्या चौकशीत अल्पवयीन मुलाने सांगितले की, आरोपी महिलेने 29 जून रोजी त्याला घेऊन घर सोडले. ती त्याला वांद्रे रेल्वे स्टेशनला घेऊन गेली. तिथे तिने दोघांचा मोबाईल आणि सीमकार्ड नष्ट केले. त्यानंतर आरोपी महिला अल्पवयीन मुलाला घेऊन नवी दिल्ली येथे गेली. तेथे ती भाडेतत्वावर घर शोधत होती. मात्र, घर उपलब्ध न झाल्याने ती बडोदा, नवसारी येथे गेले. तेथे ते 11 ऑगस्ट पर्यंत थांबले परंतू तेथेही काही बस्तान न बसल्याने ते पुन्हा मुंबईला आले.

पोलीसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलाने अशीही माहिती दिली की, आरोपी महिलेने त्याला जबरदस्तीने शरीसंबंध (सेक्स) ठेवण्यास भाग पाडले. पोलीसांनी आरोपी महिलेविरोधात भारतीय दंड संहीता (आयपीसी) कलम 363 (अपहरण) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच, बाल लैंगिक हक्क संरक्षण (POCSO) कायद्याखालीही गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 21 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.