Kidnapping Thriller In Mumbai: मुलीचे अपहरण आणि शोधमोहीमेचे थरारनाट्य, वयाच्या 7 व्या वर्षी हरवलेली पूजा, 9 वर्षांनी कुटुंबीयांना भेटली

एखाद्या चित्रपटात पाहावी किंवा गुढ कादंबऱ्यांमध्ये वाचायाला मिळावी अशी अपहरणाची चित्तथरारक (Kidnapping Thriller ) घटना घडली आहे. वयाच्या 7 व्या वर्षी बेपत्ता झालेली मुलगी चक्क वयाच्या 9 व्या वर्षी अत्यंत आश्चर्यकारकरित्या सापडली आहे. तिचे अपहरण (Girl Kidnapping) झाले होते.

एखाद्या चित्रपटात पाहावी किंवा गुढ कादंबऱ्यांमध्ये वाचायाला मिळावी अशी अपहरणाची चित्तथरारक (Kidnapping Thriller ) घटना घडली आहे. वयाच्या 7 व्या वर्षी बेपत्ता झालेली मुलगी चक्क वयाच्या 9 व्या वर्षी अत्यंत आश्चर्यकारकरित्या सापडली आहे. तिचे अपहरण (Girl Kidnapping) झाले होते. या मुलीच्या संघर्षाची आणि तिच्यासोबत घडलेल्या घटानांची कहाणी जेव्हा पुढे आली तेव्हा अनेकांना धक्का बसला. ही मुलगी 22 जानेवारी 2013 रोजी बेपत्ता झाली होती. बेपत्ता झाली तेव्हा ती अवघ्या 4 वर्षांची होती. त्यानंतर ती नऊ वर्षांची असताना अचाकन कुटुंबीयांना भेटली. यात मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि इतर जागृक नागरिकांची मोठी मदत झाली. 4 ऑगस्ट रोजी ती कुटुंबीयांना भेटली.

चित्तथरारक घटनेबाबत अधिक माहिती अशी की, डिसोझा आणि सोनी या दाम्पत्यास मुलबाळ नव्हते. त्यामुळे आपल्याला मुल असावे अशी त्यांची अतिशय उत्कट इच्छा होती. परंतू, ते त्यांना होत नव्हते. त्यामुळे या दाम्पत्याने कुठून तरी आयते मूल मळविण्याचा विचार केला. त्यांच्या मनात या विचाराने इतके घर केले. की, त्यांनी थेट कृती केली. डिसूझा दाम्पत्याने या मुलीचे अपहरण केले. त्यानंतर त्यांनी तीला कर्नाटक येथील रायचूर येथील वसतीगृहात पाठवले. दरम्यान, या दाम्पत्याला 2016 मध्ये मुलगा झाला. मुलगा झाल्याच्या आनंदापुढे त्यांना या मुलीचे महत्त्व राहिले नाही. त्यांनी सोनी हिला कर्नाटकमधील वसतीगृहातून परत बोलावले आणि घरकामाला जुंपले. दोन मुलांचा खर्च परवडत नाही म्हणून तिला बेबीसीटरचे काम करायला लावले.

दरम्यानच्या काळात, डिसूझा दाम्पत्य अपहरण केलेल्या या मुलीला घेऊन पुन्हा मुंबईत आले. त्यांनी अंधेरी (पश्चिम) येथील गिल्बर्ट हिल भागात एक घर भाड्याने घेतले. महत्त्वाचे असे की, या मुलीचे याच भागातून अपहरण करण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे अपहरण झाले तेव्हा ही मुलगी याच भागात राहात होती. डिसूझा दाम्पत्याला असे वाटत होते की, आता इतकी वर्षे लोटली. या मुलीला कोण ओळखणार? पण, तसे घडले नाही. पोलीस या मुलीपर्यंत पोहोचले.

मुलीचे अपहरण केले प्रकरणी मुंबई पोलिसांनी डिसोझा नामक व्यक्ती आणि त्याची पत्नी सोनी या दोघांना अटक केली आहे. मुंबई पोलिस दलातील निवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र धोंडू भोसले यांनी वेळीच दाखवलेली जागरुकता आणि सामाजिक कर्तव्यापोटी निभावलेली जबाबदारी अधिक महत्त्वपूर्ण ठरली. डी. एन. नगर पोलिसांची कामगिरी सुद्धा यात अत्यंत महत्त्वाची ठरली. डीएन नगर पोलिसांच्या कामगिरीबद्दल मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी डी. एन. नगर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.

ट्विट

अधिक माहिती अशी की, डी. एन. नगर पोलिस ठाण्यात सहायक उपनिरीक्षक राजेंद्र धोंडू भोसले यांनी तब्बल 166 मुली बेपत्ता झाल्याची प्रकरणे नोंदवली होती. या सर्व मुली बेपत्ता होण्याचा काळ 2008 ते 2015 हा होता. राजेंद्र भोसले आणि त्यांची टीम या मुलींच्या शोधासाठी जोरदार प्रयत्न करत होते. नोंदविलेल्या एकूण गुन्ह्यापैकी 165 मुलींचा शोध त्यांना लागला. पण, 1 मुलगी मात्र अद्याप सापडली नव्हती. विशेष म्हणजे राजेंद्र भोसेल यांनी सेवेत असताना या मुलीचा शोध घेतलाच. परंतू, दोन वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले तरीही त्यांनी शोध सोडला नव्हता. ते प्रयत्न करत राहिले आणि त्यांना यशही मिळाले.

डीएन नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस अधिकारी मिलिंद कुर्डे यांनी सांगितले की, आम्ही 9 वर्षांपासून तिचा (मुलीचा) शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु काही उपयोग झाला नाही. नुकताच आम्हाला तिच्याबद्दल एक फोन आला. आम्ही कारवाईत केली घेतली आणि चौकशीदरम्यान आम्हाला कळले की तिचे अपहरण कसे झाले. सध्या तिला कुटुंबाकडे सोपवले आहे. ती सुखरुप आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement