Keshavrao Dhondge Passes Away: ज्येष्ठ शेकाप नेते केशवराव धोंडगे यांचे निधन 102 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ते 102 वर्षांचे होते. औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेचा श्वास घेतला. केशवराव धोंडगे (Keshavrao Dhondge) हे प्रदीर्घ काळ राज्याच्या राजकारणात होते.

शेतकरी कामगार पक्षाचे (Peasants and Workers Party of India) ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे (Keshavrao Dhondge Passes Away ) यांचे निधन झाले आहे. ते 102 वर्षांचे होते. औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेचा श्वास घेतला. केशवराव धोंडगे (Keshavrao Dhondge) हे प्रदीर्घ काळ राज्याच्या राजकारणात होते. विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य होण्याचा मानही त्यांना मिळाला होता. आमदार आणि खासदार म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ लोकप्रतिनिधी म्हणून काम केले.

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोकळेढाकळे व्यक्तीमत्व अशी केशवराव धोंडगे यांची ओळख होती. त्यांच्या जन्माची नोमकी नोंद आढळत नाही. परंतू, विधिमंडळाच्या सदस्य परिचय पुस्तिकेचा आधार घेतला तर त्यावर 25 जुलै 1922 अशी त्यांची जन्मतारखी आढळते. त्यावरुन लक्षात येते की केशवराव धोंडगे हे किती ज्येष्ठ व्यक्तीमत्व होते. (हेही वाचा, Maharashtra Monsoon Session: डॉ. भाई केशवराव धोंडगे यांचा शतकपूर्तीनिमित्त विधानभवनात मान्यवरांच्या हस्ते गौरव)

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या एका छोट्याशा गावातून केशवराव धोंडगे यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. त्यांनी शेतकरी कामगार पक्षासोबत स्वत:ला जोडून घेतले. त्यांची साम्यवाद, मार्क्सवाद अशा दोन्ही विषयांवर अढळ निष्ठा होती. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न अत्यंत पोटतीडकिने विधिमंडळ आणि संसदेत मांडले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif