Katol Road Accident: भीषण अपघातात चार महिला मजुर ठार, पाच गंभीर जखमी; नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील घटना

ही घटना काटोल तालुक्यातील ईसापुर-घुबडमेट (Isapur-Ghubadmet Road) रस्त्यावर आज (रविवार, 2 जानेवारी) पाहटे घडली

Accident | Edited Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील काटोला (Katol ) तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात चार महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे. ही घटना काटोल तालुक्यातील ईसापुर-घुबडमेट (Isapur-Ghubadmet Road) रस्त्यावर आज (रविवार, 2 जानेवारी) पाहटे घडली. चालकाकडून वाहनावरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे. अपघातात मृत्यू झालेले सर्व महिला कामगार राहत्या परीसरातील संत्रा बागेत कामासाठी बोलेरो पिकअप व्हॅनने निघाल्या होत्या. दरम्यान, रस्त्यातच त्यांच्या वाहनाला भीषण अपघात (Nagpur Accident) घडला.

प्राप्त माहितीनुसार, रविवारी पहाटे चार वाजणेच्या सुमारास अपघाताची घटना घडली. महिला मजुरांना घेऊन निघालेली बोलेरो पिकअप व्हॅन रस्त्याकडेच्या झाडाला धडकली. चालकाचे वाहनावरचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात तीन महिला मजूर जागीच ठार झाल्या. तर एकीचा रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला. (हेही वाचा, Mumbai: बोरीवलीमध्ये चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दोघांचा बळी, आरोपीवर गुन्हा दाखल)

मृत महिला मजुरांची नावे

दरम्यान, अपघातात इतर पाच महिला मजूर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती कळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. हातावरचे पोट असलेल्या आणि अनेक कुटुंबातील कर्त्या असलेल्या महिलांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर उभा राहिला आहे.