Kartiki Ekadashi 2019 Special Trains: कार्तिकी एकादशीला पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांसाठी मुंबई, नांदेड, पुणे व आदिलाबाद येथून धावणार विशेष ट्रेन; जाणून घ्या वेळापत्रक
या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून उद्या म्हणजेच 6 नोव्हेंबर पासून खास ट्रेनच्या फेऱ्या ठेवण्यात आल्या आहेत. मुंबई (Mumbai), नांदेड (Nanded), पुणे (Pune) व आदिलाबाद (Aadilabad) येथून या गाड्या सुटणार आहेत.
Pandharpur Kartiki Ekadashi Special Trains: येत्या शुक्रवारी (8 नोव्हेंबर) रोजी महाराष्ट्रात कार्तिकी एकादशीचा (Kartiki Ekadashi) उत्सव रंगणार आहे. यानिमित्ताने अनेक वारकरी व भाविक मंडळी पंढरपुरी (Pandharpur) विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून उद्या म्हणजेच 6 नोव्हेंबर पासून खास ट्रेनच्या फेऱ्या ठेवण्यात आल्या आहेत. मुंबई (Mumbai), नांदेड (Nanded), पुणे (Pune) व आदिलाबाद (Aadilabad) येथून या गाड्या सुटणार असून याबबत ट्विटच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी यातील मुंबईहून सुटणाऱ्या काही गाड्या अचानक रद्द करण्यात आल्या होत्या मात्र प्रवाशांच्या तक्रारीनंतर या गाड्यांच्या फेऱ्या पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. यंदा आपणही एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर वारी करू इच्छित असाल तर संबंधित गाड्यांचे वेळापत्रक आपल्या नक्की कामी येईल.
मुंबई- पंढरपूर
उद्यापासून म्हणजेच 6, 7 आणि 8 नोव्हेंबर रोजी मुंबईहून पंढरपूर कडे जाणाऱ्या तर एकादशी नंतर 8, 9, 10 नोव्हेंबर रोजी पंढरपूरहून मुंबईकडे येणाऱ्या ट्रेन चालवण्यात येतील.
पुणे- पंढरपूर
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने अधिक प्रवासी आटोक्यात आणण्यासाठी पुणे येथून 7 नोव्हेंबर रोजी पंढरपूर ला जाणारी आणि 9 नोव्हेंबर रोजी पंढरपूर हुन पुण्याला येणारी विशेष ट्रेनची फेरी नियोजित करण्यात आली आहे. या गाड्यांचे बुकिंग्स आज सकाळपासून सुरु झाले आहेत.
नांदेड/ आदिलाबाद- पंढरपूर
7 नोव्हेंबर रोजी आदिलाबाद येथून पंढरपूर ला जाणारी तर 11 नोव्हेंबर रोजी पूर्णा येथून पंढरपुरला जाणारी ट्रेन उपलब्ध असणार आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातून पंढरपूर कडे जाणाऱ्या ट्रेनच्या फेऱ्या कमी असल्याने कराड, सांगली, सातारा तसेच नाशिक, कोल्हापूर, दौंड येथील भाविक सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहेत. कार्तिकी एकादशीचा मुहूर्त जरी 8 नोव्हेंबर रोजी असला तरी तुलसी विवाह आणि कार्तिकी स्नान तिथी 12 नोव्हेंबर पर्यंत आहे तोपर्यंत पंढरपुरात भाविकांची मोठी वर्दळ पाहायला मिळणार आहे.