Karjat Station Power Block: कर्जत- खोपोली दरम्यान 9-11 मे दरम्यान स्पेशल ट्राफिक-पॉवर ब्लॉक; पहा कोणत्या ट्रेनवर परिणाम
ब्लॉकच्या काळामध्ये कर्जत साठी खोपोली वरून सुटणारी 11.20 आणि 12.40 ची ट्रेन तसेच कर्जत कडून खोपोली कडे जाणारी 12 आणि 1.15 ची ट्रेन या दरम्यान रद्द असणार आहे.
मध्य रेल्वेच्या (Central Railway) कर्जत- खोपोली (Karjat-Khopoli) दरम्यान 3 दिवसांचा स्पेशल ट्राफिक पॉवर (Special Traffic Power) जाहीर करण्यात आला आहे. आजपासून म्हणजे 9 ते 11 मे दरम्यानचा हा ब्लॉक आहे. कर्जत यार्ड मॉडीफिकेशन (Karjat Yard Modification) साठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. 9 ते 11 मे दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान हे काम केले जाणार आहे.
ब्लॉकच्या काळामध्ये कर्जत साठी खोपोली वरून सुटणारी 11.20 आणि 12.40 ची ट्रेन तसेच कर्जत कडून खोपोली कडे जाणारी 12 आणि 1.15 ची ट्रेन या दरम्यान रद्द असणार आहे. नक्की वाचा: Summer Special Trains: मध्य रेल्वेकडून पुणे-रत्नागिरी-पनवेल मार्गावर अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा; जाणून घ्या वेळा व मार्ग .
कर्जत यार्ड मॉडिफिकेशनच्या या स्पेशल ब्लॉकचा परिणाम लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर देखील झाला आहे. 22731 हैदराबाद- मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस आपल्या अंतिम स्थानी 2 तास 10 मिनिटं उशिरा येणार आहे. ही 10.32 ते 11.25 दरम्यान लोणावळा स्थानकामध्येच असणार आहे. तर 11014 ही कोईंबतूर ते एलटीटी एक्सप्रेस, 12263 पुणे हजरत निझामुद्दीन एक्सप्रेस, 22180 चेन्नई- एलटीटी विकली एक्सप्रेस,22919 चैन्नई सेंत्रल ते अहमदाबाद एक्सप्रेस पुणे जंक्शन वर थांबवली जाईल. 12164 चैन्नई सेंट्रल-एलटीटी सुपरफास्ट एक्सप्रेस 15-20 मिनिटं उशिराने धावणार आहे.
दरम्यान मागील महिन्यात देखील अशाप्रकारचा ब्लॉक घेण्यात आला होता. टप्प्या टप्प्याने कर्जत यार्ड मॉडीफिकेशनचं काम केले जाणार आहे.