Kapil Sibal On Eknath Shinde: कपिल सिब्बल यांचा शिंदेंवर निशाणा; म्हणाले, 'पाठीत वार करणारे बाळासाहेबांचा वारसा पुढे नेऊ शकत नाहीत'
शिंदे यांच्यावर निशाणा साधत सिब्बल यांनी पुढे म्हटलं आहे की, बाळासाहेबांचा वारसा कारस्थानी, संधिसाधू, पाठीराखे कधीही पुढे नेऊ शकत नाही.
Kapil Sibal On Eknath Shinde: राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अयोध्या दौऱ्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पाठीत वार करणारे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढे नेऊ शकत नाहीत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे गेल्या वर्षी जूनमध्ये मुख्यमंत्री झाले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे. अयोध्या दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्तेही उपस्थित होते.
सिब्बल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, भगवान रामाने त्याग, सत्य आणि प्रामाणिकपणा निवडला. बाळासाहेबांनीही ही वैशिष्ट्ये आत्मसात केली. शिंदे यांच्यावर निशाणा साधत सिब्बल यांनी पुढे म्हटलं आहे की, बाळासाहेबांचा वारसा कारस्थानी, संधिसाधू, पाठीराखे कधीही पुढे नेऊ शकत नाही. (हेही वाचा - Eknath Shinde Return Mumbai From Ayodhya: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावरुन मुंबईत परतले, अयोध्या दौरा यशश्वी झाल्याचे सांगितले)
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी रविवारी पक्षाचे आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांसह रामललाचे दर्शन घेतले. त्यानंतर मुख्यमंत्रीही हनुमानगढीला भेट देण्यासाठी पोहोचले. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते. अमरावतीमध्ये भव्य हनुमान मंदिर बांधण्यात येणार असून, त्यासाठी शिवसेनेचा एक गट हनुमानगढीची माती घेऊन अमरावतीला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अयोध्येत सांगितले की, त्यांचा पक्ष आणि भाजपची विचारधारा एकच आहे. पुढील वर्षी ते राज्यभर भगवा फडकवतील. आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. शिवसेनेची भाजपसोबत युती आहे. आपली विचारधारा, जी हिंदुत्व आहे, तीच आहे. अयोध्येतून नवीन ऊर्जा घेऊन आम्ही आमच्या राज्यात जाऊ आणि जनतेची सेवा करू. 2024 मध्ये राज्यभर शिवसेना आणि भाजपचा भगवा फडकणार असल्याचा विश्वास यावेळी महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला.