Virginity Test: कौमार्य चाचणी प्रथेस विरोध केल्याने अंबरनाथ येथील कांजरभाट समाजाचा वृद्धेच्या अंत्ययात्रेवर बहिष्कार

त्यामुळे अशा पद्धतीचे वर्तन जर कोणाकडून होत असेल तर, पीडितांनी आमच्याकडे यावे. आम्ही रितसर गुन्हा दाखल करुन दोषी मंडळींवर कारवाई करु, असे अवाहन पोलिसांनी केले आहे. या पार्श्वभूमविर विवेक तमाचिकर यांनी पोलिसांशी संपर्क साधला आहे किंवा नाही याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

Virginity Test | (Photo credit: archived, edited, symbolic images)

अंबरनाथ (Ambernath) येथील कांजरभाट (Kanjarbhat Community) समाजाने आपल्याच समाजातील एका कुटुंबावर बहिष्कार टाकत वृद्धेच्या अंत्ययात्रेस जाण्यास नकार दिला. ही वृद्धा विवेक तमाचीकर (Vivek Tamachichar) या तरुणाची आजी आहे. विवेक तमाचीकर यांनी विवाह केल्यावर कौमार्य चाचणी (Virginity Test) करण्यास विरोध केला होता. त्यामुळे चिडलेल्या कांजरभाट समाज आणि समाजातील जातपंचायतीने बहिष्काराचा निर्णय घेतल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार, विवेक तमाचीकर यांचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. विवेक यांचा विवाह झाल्यानंतर तमाचिकर यांना परंपरेने कौमार्य चाचणीला सामोरे जाण्यास सांगण्यात आले. मात्र, त्यांनी त्यास विरोध केला. यावर समाजातील काही मंडळींनी त्यांच्यावर कौमार्य चाचणीसाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही भीक न घालता विवेक तमाचीकर यांनी दबाव झुगारुन देत आपण कौमार्य चाचणी करणार नाही असे ठासून सांगितले. त्यानंतर समाजाकडून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. त्यातूनच आता अंत्ययात्रेतही सहभागी होण्यावर समाजाने बहिष्कार टाकल्याचे समजते. (हेही वाचा, Virginity Test: पुढारलेल्या पुण्यात पुन्हा एकदा नववधूंची ‘कौमार्य’चाचणी; शहरातील उच्चभ्रू परिसरातील घटना)

दरम्यान, कोणावरही सामाजिक बहिष्कार टाकणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे वर्तन जर कोणाकडून होत असेल तर, पीडितांनी आमच्याकडे यावे. आम्ही रितसर गुन्हा दाखल करुन दोषी मंडळींवर कारवाई करु, असे अवाहन पोलिसांनी केले आहे. या पार्श्वभूमविर विवेक तमाचिकर यांनी पोलिसांशी संपर्क साधला आहे किंवा नाही याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.