Kandivali, Borivali Water Cut Update: मुंबई मध्ये कांदिवली, बोरिवली भागात 3 मे दिवशी पाणी कपातीची शक्यता; BMC कडून पाईपलाईन दुरूस्तीचं काम

महावीर नगर मध्ये नवी पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेतले जाईल. यामुळे लीकेज कमी होईल आणि कांदिवली पश्चिम भागात पाणी पुरवठा अधिक दाबाने होण्याची शक्यता आहे.

Water Supply | (Photo credit: archived, edited, representative image)

मुंबई (Mumbai)  मध्ये 2 मे दिवशी रात्री 10च्या सुमारास बीएमसी कडून मिठी चौकी जंक्शन (Mithi chowky junction) ते महावीर नगर जंक्शन (Mahavir Nagar junction) मध्ये पाईपलाईन बदलण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे. या कामाला 24 तासांचा वेळ लागण्याची शक्यता आहे. या कामासाठी पाईपलाईन पूर्ण बंद करण्यासाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जाईल. परिणामी बोरिवली, कांदिवली भागामध्ये 3 मे दिवशी काही ठिकाणी पाणी पुरवठा विस्कळीत असेल तर काही ठिकाणी तो पूर्णपणे बंद ठेवला जाईल.

जुनी पाईपलाईन 1200 एमएम ची आहे ती बदलली जाईल. महावीर नगर मध्ये नवी पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेतले जाईल. यामुळे लीकेज कमी होईल आणि कांदिवली पश्चिम भागात पाणी पुरवठा अधिक दाबाने होण्याची शक्यता आहे. पाईपलाईन बदलाचं हे काम 2 मे च्या रात्री 10 वाजल्यापासून 3 मे च्या रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत जनकल्याण नगर, छत्रपती शिवाजी राजे संकुल, म्हाडा वसाहत या भागात 3 मे रोजी सकाळी 1.30 ते पहाटे 2.55 या वेळेत पाणीपुरवठा होणार नाही.  BMC New Swimming Pools: बीएमसी लवकरच खुली करणार मुंबईकरांसाठी नव्याने बांधलेले 3 स्विमिंग पूल्स; ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 6 मार्च पासून सुरू .

पहाटे 3.40 ते 5.50 दरम्यान पाणी पुरवठ्याचि वेळ असलेल्या लालजी पाडा, के.डी. कंपाऊंड, गांधी नगर, संजय नगर, बंदर पाखाडी, भाबरेकर नगर, म्हाडा एकता नगर, महावीर नगर, इराणी वाडी, कांदिवली गावठाण, महात्मा गांधी मार्ग, शंकर गल्ली, मथुरदास मार्ग, शांतीलाल मोदी मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग (पाण्याची वेळ सकाळी ९.३० वा. सकाळी 11), चारकोप म्हाडा सेक्टर 1 ते 9 (सकाळी 11.45 ते दुपारी 2.05 दरम्यान पाणीपुरवठा) पाणीपुरवठा होणार नाही.