नवी मुंबई: कामोठे परिसरात भरधाव वेगातील कारच्या धडकेत 2 जण ठार; 4 जणांची प्रकृती चिंताग्रस्त

एका भरधाव वेगात असलेल्या कारने समोरून येणार्‍या बाईक आणि स्कूल बसला ठोकर दिली. या धडकेत 2 जण ठार झाले असून 4 जणांची प्रकृती चिंताग्रस्त आहे.

Image used for representational purpose | (Photo Credits: ANI)

नवी मुंबईतील (Navi Mumbai)  पनवेल नजिक कामोठे (Kamothe) परिसरात काल (21 जुलै) च्या रात्री भयंकर अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारच्या धडकेत 2 जण ठार झाले असून 4 जणांची प्रकृती चिंताग्रस्त आहे. कारचा ड्रायव्हर अपघातानंतर फरार असून त्याचा पोलिस तपास सुरू आहे. जखमींवर नवी मुंबईतील एमजीएम रूग्णालयामध्ये (MGM Hospital) उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये 7 वर्षाच्या सार्थक चोपडे या चिमुकल्याचा समावेश आहे. तर वैभव गुरव या 32 वर्षीय इसमाचादेखील जागीच मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कामोठे येथील सेक्टर 6 या परिसरामध्ये हा भयंकर अपघात झाला आहे. एका भरधाव वेगात असलेल्या कारने समोरून येणार्‍या बाईक आणि स्कूल बसला ठोकर दिली. या धडकेत दोन जण बेशुद्ध पडले. तर दुचाकीस्वार देखील या धडकेत बाहेर फेकला गेला. वर्दळीच्या रस्स्त्यावर अन्य काही जणांनादेखील या गाडीने उडवल्याने काही जण जखमी आहेत. प्रवासादरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी चारचाकी वाहनांवर 'रिफ्लेक्टर' बंधनकारक

ANI Tweet

कामोठ्यातील हा अपघात 'डृंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह' प्रकारातील असल्याचं प्रथम दर्शनी समोर आलं आहे. तसेच अपघाताचं सीसीटीव्ही फूटेजही आता पोलिसांच्या हाती लागले आहे.