Kalyan Shocker: कल्याण मध्ये नऊ वर्षीय मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

कल्याण (Kalyan) मध्ये एका नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करून तिची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कल्याण (Kalyan) मध्ये एका नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual  Assault) करून तिची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हत्याकांडानंतर कल्याण शहरामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान या हत्याकांडातील संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. ही घटना आज (1 डिसेंबर) सकाळची आहे.

कल्याण पश्चिम  मध्ये रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या न्यू मोनिका बिल्डिंग मध्ये सकाळी नऊ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. मृतदेह पाहून तातडीने स्थानिकांनी महात्मा फुले पोलिस स्टेशन मध्ये त्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, मुलीच्या वडिलांनी त्या मुलाला मारलं होतं. तो राग मनात ठेवत मुलाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या केल्याचा अंदाज आहे. पोलिस चौकशीमध्ये हा मुलगा 15 वर्षीय म्हणजे तो ही अल्पवयीन असल्याचं समजलं आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दोघेही फिरस्ता होते ते स्टेशन वर राहत होते.

मुलीचा मृतदेह सध्या पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. नक्की वाचा: Mumbai Shocker: मुंबईत Korean woman YouTuber च्या विनयभंग प्रकरणी 2 तरूणांना अटक - मुंबई पोलिस.

आज मुंबई मध्येही एका कोरियन युट्युबरचा लाईव्ह स्ट्रिमिंग मध्ये विनयभंग केला असल्याचा एक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन तरूणांना अटक केली आहे. सु मुटो अंतर्गत कारवाई केल्याची माहिती दिली आहे.