कल्याण: शिवसेना नगरसेविका मनीषा तरे यांच्या पती विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

कल्याण (Kalyan) मधील शिवसेना (Shivsena) नगरसेविका मनीषा तरे (Manisha Tare) यांचे पती साईनाथ तरे (Sainath Tare) यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा (Rape) दाखल करण्यात आला आहे.

कल्याण: शिवसेना नगरसेविका मनीषा तरे यांच्या पती विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

कल्याण (Kalyan) मधील शिवसेना (Shivsena) नगरसेविका मनीषा तरे (Manisha Tare) यांचे पती साईनाथ तरे (Sainath Tare) यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा (Rape)  दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने स्वतः कोळसेवाडी पोलिसात (Kolsewadi Police)  तक्रार नोंदवली होती त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु करून हा गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, साईनाथ यांनी सप्टेंबर 2018 मध्ये व्यवसायात भागिदारीसाठी नेतिवली भागातील मेट्रो मॉलला (Metro Mall) या महिलेला बोलावून घेतले होते. मात्र भेटीनंतर महिलेने भागिदारीस नकार दर्शवल्यावर आरोपीने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास अथवा पोलिसांकडे तक्रार केल्यास पती आणि पाच वर्षाच्या मुलीला जीवे मारून टाकू अशी धमकी सुद्धा साईनाथ याने महिलेला दिली होती. इतकंच नव्हे तर हिच भीती दाखवत साईनाथ याने पीडितेकडून कोणतीही तक्रार नसल्याची नोटरी सुद्धा करून घेतली होती.

माटुंगा रेल्वे स्थानकाच्या पुलावर दिवसाढवळ्या महिलांची छेडछाड; किळसवाणा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

प्राप्त माहितीनुसार, महिलेने आपल्या तक्रारीत या एकूण घटनेचा उलगडा केला आहे. सर्वात आधी साईनाथ याने महिलेला आपल्या ऑडी कारमध्ये बसवून तिचे जबरदस्ती चुंबन घेतले. याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट करुन तो व्हायरल करण्याची भीती घातली. आणि मग कार पत्रीपूल एपीएमसी मार्केटच्या पाठीमागे नेऊन बलात्कार केला. आरोपीने धमकावल्याने महिला पोलिसांकडे गेली नाहीच मात्र काही दिवसाने साईनाथ याने फेसबुकवर अश्लील फोटो पाठवत पुन्हा तिचा छळ सुरु केला. शेवटी अगदी हतबल झाल्यावर महिलेने आता पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला असून अद्याप साईनाथ याला अटक करण्यात आलेली नाही. साईनाथ तरे याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी सुद्धा अर्ज केला होता.

(The above story first appeared on LatestLY on Feb 07, 2020 08:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).