Juhu beach clean-up drive in Mumbai: दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर मुंबईच्या जुहू बीच क्लिनअप मध्ये आज Amruta Fadnavis, Shrikant Shinde सह सेलिब्रिटींची हजेरी (Watch Video)
जुहू बीच वर आज सकाळी विशेष स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता.
दहा दिवसांचा गणेशोत्सव आणि त्या पाठोपाठ यंदा गांधी जयंतीच्या अनुषंगाने 'स्वच्छता ही सेवा' उपक्रमाची घोषणा करण्यात आल्याने आज जुहू बीच वर विशेष स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. त्यांना अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची देखिल साथ मिळाली होती. मनुश्री छिल्लर, राजकुमार राव आदींनी आज जुहू बीच वर स्वच्छता मोहिमेत हातभार लावलेला दिसला आहे.
सेलिब्रिटींसोबतच प्रशासकीय सेवेत असलेल्या मुंबई महानगरपालिका आयुक्त Iqbal Singh Chahal, मुंबई पोलिस कमिशनर Vivek Phansalkar यांचाही सहभाग दिसून आला आहे. सध्या 'स्वच्छता ही सेवा' हा उपक्रम देशभर सुरू आहे. यामध्ये 1 ऑक्टोबरला एक तास श्रमदान केले जाणार आहे. त्या अनुषंगाने मुंबई मध्ये रविवारी 1 ऑक्टोबरला 168 ठिकाणी स्वच्छता मोहिम, श्रमदानांतर्गत चालवली जाणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका आयुक्त चहल यांनी दिली आहे.
जूहू बीच क्लिन अप
सेलिब्रीटींचा सहभाग
खासदार श्रीकांत शिंदे
इक्बाल सिंह चहल
मुंबई मध्ये आता समुद्रात केमिकल फ्री पाणी सोडलं जाईल तसेच 7 Sewage Treatment Plants द्वारे पाणी स्वच्छ केले जाईल त्याचबरोबर याचा फायदा समुद्रातील जलजीवन सुरक्षित ठेवण्यासाठीही होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अमृता फडणवीस यांनीही आपण सण-समारंभ साजरे करताना आपली पृथ्वी एकच आहे आणि ती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीही आपली असल्याचं म्हटलं आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)