मुंबई: कॅनडीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी 5 स्टार हॉटेल कर्मचाऱ्याला अटक
जुहू येथील एका 5 स्टार हॉटेलमधील परदेशी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी हॉटेल कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
जुहू येथील एका 5 स्टार हॉटेलमध्ये परदेशी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी हॉटेल कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी 29 वर्षीय कॅनडीय महिलेने (canadian woman) सांताक्रुझ पोलिस स्टेशनमध्ये (Santacruz Police Station) तक्रार दाखल केल्यानंतर हॉटेल कर्मचारी सुमित राव (Sumit Rao) याला अटक करण्यात आली.
पीडित कॅनडीय महिलेने सांगितले की, "या प्रकरणाची तक्रार मी हॉटेल मॅनेटमेंटकडे केली. पण त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही. उलट तुम्ही स्वतःच पोलिसात तक्रार करा, असे उलट सांगण्यात आले." त्यानंतर महिला दुसऱ्या हॉटेलमध्ये स्थलांतरीत झाली आणि तिने सांताक्रुझ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोरंजन विश्वातील कामानिमित्त ही महिला अनेकदा भारतात येत असते आणि जुहूमधील त्या हॉटेलमध्ये राहत असते. यावेळेस ती 3 जानेवारीला आली होती. 5 जानेवारीला रुममध्ये असताना रात्री 10:30 च्या सुमारास हॉटेल मधील कर्मचारी सुमित राव याने तिच्या रुमची बेल वाजवली. त्याने तिला गिफ्ट देऊन तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी जवळ येण्याचा प्रयत्न करु लागला. तिने विरोध करुनही तो त्याचे गैरवर्तन थांबवत नव्हता. त्यानंतर मात्र त्या महिलेने आरडाओरडा करत त्याला तेथून जाण्यास सांगितले. दादर रेल्वे स्टेशन फलाटावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस अटक
सुमीत अनेकदा रुम स्वच्छतेच्या निमित्ताने तिच्या रुममध्ये येत असल्याने तो तिच्या माहितीतला होता, असेही पीडित महिलेने सांगितले.