तरुणीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायलयीन कोठडी

या प्रकरणी मालवणच्या न्यायालयाने आरोपी तरुणाला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

फोटो सौजन्य - फाइल फोटो

मालवणमध्ये तरुणीचा चालत्या दुचाकीवर विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मालवणच्या न्यायालयाने आरोपी तरुणाला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गणेश घुमडेकर असे या तरुणाचे नाव आहे. मालवणमध्ये राहणाऱ्या दोन तरुणी कट्टा येथून मालवणच्या दिशेने येत होत्या. त्यावेळी तेथूनच बाजूने जाणाऱ्या गणेशने त्याची दुचाकीचा वेग कमी करत युवीसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी या पीडित तरुणीने पोलिसांकडे तक्रार करुन गणेश विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी गणेशला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर  गणेशला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.



संबंधित बातम्या