Job Opportunities for Third Gender: औरंगाबाद महापालिका देणार तृतीयपंथीयांना नोकरी, प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांचा निर्णय
संधी देण्यात येणाऱ्या लोकांना स्मार्ट सीटी अभियानाच्या अंतर्गत कंत्राटी पद्धीतीने नोकरीवर घेतले जाणार आहे.
आजवर समाजातून सातत्याने डावलला जाणारा वर्ग म्हणजे तृतीयपंथी (Third Gender Society) समाज. अशा समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी औरंगाबाद महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्राप्त माहितीनुसार, औरंगाबाद महापालिकेत तृतीयपंथी (Third Gender) घटकातील व्यक्तींना नोकरीची संधी दिली जाणार आहे. असा निर्णय घेणारी घेणारी औरंगाबाद महापालिका (Aurangabad, Aurangabad Municipal Corporation) बहुदा पहिलीच महापालिका असावी. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड आणि औरंगाबाद महानगरपालिका अशा संयुक्त विद्यमाने तृतीयपंथीयांना (Tritiya Panthi) नोकरीत सामावून घेतले जाणार आहे. संधी देण्यात येणाऱ्या लोकांना स्मार्ट सीटी अभियानाच्या अंतर्गत कंत्राटी पद्धीतीने नोकरीवर घेतले जाणार आहे.
समाजात तृतीयपंथी घटकांची संख्या मोठी आहे. हा समाज समाजाच्या मुख्य प्रवाहापासून अद्यापही दूर आहे. महत्त्वाचे म्हणजे या समाजात शिकलेल्या घटकांची संख्याही मोठी आहे. शिक्षित उच्चशिक्षीत असूनही या समाजातील अनेकांना केवळ समाजव्यवस्थेमुळे घर आणि चरितार्थ चालविण्यासाठी दारोदार पैसे मागत फिरावे लागते. अवहेलनात्मक जीवन जगावे लागते. त्यामुळे अशा घटकांना रोजगार देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असल्याचे आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले आहे. टीव्ही नाईन या खासगी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, बदलत्या काळासोबत समाजही बदलताना दिसतो आहे. तृतीयपंथी समाजातही अनेक लोक शिक्षित, उच्चशिक्षीत होत आहेत. त्यामुळे असे तृतीयपंथी तरुण मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या शोधात आहेत. काहींना स्वत:च्या हिमतीवर नोकरी मिळतेही आहे. परंतू, ज्यांना समाजाची चौकट भेदता येत नाही असे लोक त्याच आपल्या पारंपरीत परंपरेत खितपत पडताान दिसत आहेत. समाजातील विकृत प्रथा परंपरांचा तृतीयपंथीयांच्या आयुष्यावर प्रचंड मोठा परिणाम होतो. याबाबत तृतीयपंथी संघटना आता आवाज उठवू लागल्या आहेत. या आवाजारा समाजातून सकारात्मकतेची जोड मिळण्याची गरज असल्याची भावना सामाचिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. लक्ष्मीनारायण त्रिपाटी, दीशा शेख यांच्यासारखे काही सामाजीक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर तृतीयपंथीयांसाठी प्रयत्न करत आहेत.