जेएनयू हिंसाचार: मुंबई मध्ये आंदोलक गेटवे ऑफ इंडिया वरून आझाद मैदानात स्थलांतरित; पोलिसांची कारवाई

तसेच या भागात सामान्य मुंबईकरांचीदेखील मोठी वर्दळ असते. त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया परिसरातील आंदोलकांना स्थलांतरित करण्यात आल्यची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Mumbaikars Protesting at Gateway of India (Photo Credits: ANI)

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीचे आता देशभर पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. दरम्यान आज (7 जानेवारी) मुंबईत गेटवे ऑफ इंडिया (Gateway of India) परिसरात सुरू असलेले आंदोलन मुंबई पोलिसांनी आझाद मैदानामध्ये (Azad Maidan‌‌‌) स्थलांतरित केले आहे. दरम्यान यामध्ये कोणत्याही आंदोलकाला अटक केलेली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त (झोन-1) संग्रामसिंह निशाणदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराची जी घटना घडली त्याच्या निषेधार्थ मुंबईत आंदोलन करण्यात येत आहे. सामान्य मुंबईकरांना त्रास होऊ देऊ नका, असं आवाहनदेखील करण्यात आले आहे. रविवार (5 जानेवारी)  रात्री दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आवारात झालेल्या हिंसाचारानंतर पोलिस तपासाला सुरूवात झाली आहे. आज दिल्ली पोलिसांनी JNUSU अध्यक्ष  Aishe Ghosh सह 19 जणांवर FIR  दाखल केली आहे.

मुंबईतील गेटवे ऑफ़ इंडिया हा परिसर पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तसेच या भागात सामान्य मुंबईकरांचीदेखील मोठी वर्दळ असते. त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया परिसरातील आंदोलकांना स्थलांतरित करण्यात आल्यची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील तरूण सुरक्षित आहे. तसेच जेएनयू मधील हिंसाचार हा मुंबईतील 26/11 हल्ल्याची आठवण करून देणारी असल्याची भावना व्यक्त केली आहे. JNU मध्ये हिंसाचार: मॉबने कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला केला, JNUSU चे अध्यक्ष आइशी घोष गंभीर जखमी; स्टुडंट युनियनने एबीव्हीपीला ठरवले दोषी.  

ANI Tweet

जेनएनयूमधील हिंसाचारानंतर समाजातील विविध स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. दरम्यान समान्यांसोबतच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील रस्त्यावर उतरून निदर्शन करताना दिसली. या प्रकारानंतर जेएनयू मधील हिंसचाराचा दिल्ली पोलिस कसून तपास करत आहेत.