Dr Tatyarao Lahane Resignation: मुंबईतील JJ Hospital मधील राजीनामास्त्राने राज्यभर खळबळ; तात्याराव लहाने यांच्यासह नऊ डॉक्टरांचे राजीनामे

या वेळी ही चर्चा रुग्णालयात विविध पदांवर काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या राजीनाम्यांमुळे सुरु झाली आहे. विख्यात नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane यांच्यासह जेजेतील सुमारे नऊ डॉक्टरांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.

Tatyarao Lahane | (File Image)

मुंबई (Mumbai) येथील जे जे रुग्णालय (JJ Hospital Mumbai) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या वेळी ही चर्चा रुग्णालयात विविध पदांवर काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या राजीनाम्यांमुळे सुरु झाली आहे. विख्यात नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane यांच्यासह जेजेतील सुमारे नऊ डॉक्टरांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. या राजीनाम्यांमुळे राज्याच्या वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, राजीनामा दिलेल्या डॉक्टरांनी एक परिपत्रक जारी करत आपली भूमिका व्यक्त केली आहे. तर रुग्णालय प्रशासनाने मात्र अद्याप कोणत्याही डॉक्टरचा राजीनामा आपल्याकडे आला नसल्याचे म्हटले आहे.

डॉ. तात्याराव लहाने आणि त्यांच्यासह राजीनामा दिलेल्या नऊ डॉक्टरांनी दिलेल्या राजीनाम्याला त्यांच्यावर झालेल्या आरोप कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. जेजे रुग्णालय नेत्रविकार विभागातील डॉक्टर, प्राध्यापक, विभाग प्रमुख हे विद्यार्थ्यांना त्रास देतात. ज्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. विद्यार्थ्यांना दिला जाणारा त्रास बंद करावा आणि विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबवावी, अशी मागणी जेजे मार्डने केली आहे. या मागणीसोबतच त्यांनी आजपासून कामबंद आंदोलनही सुरु केले आहे. या आरोपांनी व्यथीत होऊन आपण राजीनामा देत असल्याचे डॉ. लहाने यांच्यासह नऊ डॉक्टरांनी सांगितले आहे. (हेही वाचा, Tatyarao Lahane: फडणवीस सरकारने मला खूप त्रास दिला; डॉ. तात्याराव लहाने यांचा धक्कादायक खुलासा)

अत्याराव पुंडलिकराव लहाने हे एक भारतीय नेत्रचिकित्सक आणि नेत्रचिकित्सक आहेत. त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जे.जे. हॉस्पिटल, मुंबईचे डीन म्हणून काम केले आणि 162,000 हून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून जागतिक विक्रम केला. त्यांना 2008 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

जेजे रुग्णाल हे मुंबईतील एक सार्वजनिक वैद्यकीय महाविद्यालय आहे. हे रुग्णालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न आहे. 1845 मध्ये स्थापन झालेले हे दक्षिण आशियातील सर्वात जुन्या वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक आहे. त्याचे क्लिनिकल संलग्न सर जे.जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, दक्षिण मुंबईतील चार हॉस्पिटल्सचा एक समूह ज्यात सर जे.जे. हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, गोकुळदास तेजपाल हॉस्पिटल आणि कामा आणि अलब्लेस हॉस्पिटल यांचा समावेश आहे.