IPL Auction 2025 Live

'माझ्या वक्तव्यामुळे भावना दुखवल्या असतील तर खेद व्यक्त करतो पण...' - जितेंद्र आव्हाडांनी दिलं स्पष्टीकरण

तुमचा राम निवडणूकांसाठी तुम्ही बाजरात आणला आमचा राम हृद्यात राहतो असं म्हणत आव्हाडांनी भाजपाच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

Jitendra Awhad | (Photo Credits: Facebook)

शिर्डीमध्ये (Shirdi) भगवान श्रीराम (Shriram) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या शरद पवार गटाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अटकेची मागणी होत असताना आता या प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी खुलासा केला आहे. 'आपण बोलण्याच्या ओघात बोलून गेलो. पण आपल्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याच्याबद्दल खेद व्यक्त करतो.' असं ते म्हणाले आहेत. पण आपलं वक्तव्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. इतिहासाचा आपण विपर्यास करत नाही असेही ते म्हणाले आहेत.

भाजपाच्या आंदोलन आणि अटकेच्या मागणीवर बोलताना आव्हाडांनी 'आजकाल अभ्यासाला नाही तर भावनांना अधिक महत्त्व आहे'. अशी प्रतिक्रिया दिली आहे. "प्रभू श्रीरामांबद्दल बोलताना ते मांसाहारी होते. असं मी म्हटलं आहे पण हा वाद मला वाढवायचा नाही. जे याविरोधात उभे राहिले, त्यांच्या माहितीसाठी सांगतो, की वाल्मिकी रामायणात सहा कंद आहेत. अयोध्या कंदातील सर्ग २२, ५२ श्लोक १० मध्ये याबाबत उल्लेख आहे" असं सांगत आव्हाडांनी काही लिखित पुरावे सादर केले. नक्की वाचा:  Jitendra Awhad Controversial Remark on Lord Ram: 'भगवान श्रीराम मांसाहारी' वक्तव्यावर आक्षेप घेत भाजपा नेते राम कदम यांची पोलिसांत धाव, अटकेची मागणी!

आव्हाडांनी राम सत्यासाठी 14 वर्ष वनवासामध्ये राहिला. तो लहानपणापासून आमच्या हृद्यात राहतो आणि तेथेच राहणार. पण तुम्ही त्याचं अपहरण केलं. तुमचा राम निवडणूकांसाठी तुम्ही बाजरात आणला आहे. राम क्षत्रिय होता आणि तो आम्हा बहुजनांचा असल्याचं ते पुन्हा म्हणाले आहेत.

रोहित पवारांवर काय म्हणाले ?

रोहित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे त्यावर  बोलावं असं म्हणत त्यांना घरचा आहेर दिला होता. त्यावेळी रोहित पवारांकडे मी लक्ष्य देत नाही. ते लहान आहेत. त्यांची आमदारकीची पहिली टर्म आहे. अबुधाबी मध्ये जाऊन बोलणं सोप्प आहे. असं आव्हाड म्हणाले आहेत.