Jitendra Awhad On Deepak Kesarkar: जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात? खाजवून खरूज काढू नका; जितेंद्र आव्हाड यांचा दीपक केसरकर यांना इशारा
दीपक केसरकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आक्रमक नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीकास्त्र केले आहे. 'ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात? असा थेट सवाल विचारतानाच 'जिथे आहात तिथे सुखी राहा, खाजवून खरूज काढू नका' असा इशाहाही आव्हाड यांनी दिला आहे.
शिवसेना (Shiv Sena) फुटली तेव्हा प्रत्येक वेळी शरद पवार (Sharad Pawar) यांचाच हात होता, असा आरोप करत एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी जोरदार खळबळ उडवून दिली आहे. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) जोरदार आक्रमक झाली आहे. दीपक केसरकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आक्रमक नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीकास्त्र केले आहे. 'ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात? असा थेट सवाल विचारतानाच 'जिथे आहात तिथे सुखी राहा, खाजवून खरूज काढू नका' असा इशाहाही आव्हाड यांनी दिला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'अहो केसरकर किती बोलता पवार साहबांविरुद्ध. एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात? 2014 ला मीच आलो होतो साहेबांचा निरोप घेऊन. जिथे आहात तिथे सुखी राहा. खाजवून खरूज काढू नका'. (हेही वाचा, BJP Vs Eknath Shinde Group: एकनाथ शिंदे गट विरुद्ध भाजप; निलेश राणे यांची दीपक केसरकर यांच्यावर सडकून टीका)
दीपक केसरकर यांनी काय म्हटले होते?
आजवर जेवढ्या वेळा शिवसेना (Shiv Sena) मोठ्या प्रमाणावर फुटली त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार हेच असल्याचा धक्कादायक आरोप केसरकर यांनी केला आहे. छगन भुजबळ यांना शिवसेनेतून पवार यांनीच फोडले. नारायण राणे यांनाही शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवार यांनीच मदत केल्याचा दावा केसरकर यांनी केला आहे. राज ठाकरे हे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हाही शरद पवार यांचाच हात त्यापाठी होता असेही केसरकर यांनी म्हटले आहे.
ट्विट
अहो केसरकर किती बोलता पवार साहबां विरुद्ध एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले
ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात
2014 ला मीच आलो होतो साहेबांचा निरोप घेऊन
जिथे आहात तिथे सुखी राहा
खाजवून खरूज काढू नका
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 13, 2022
दरम्यान, दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या वतीने तेच भूमिका मांडत असतात. दीपक केसरकर यांनी नुकतीच राणे यांच्या मुलांवर टीका केली होती. नारायण राणे यांची दोन्ही मुले लाहान आहेत. त्यामुळे ते काय बोलतात, ट्विट करतात हे मी पाहात नाही. सध्या मी दिल्लीत आहे. महाराष्ट्रात नाही. परंतू, महाराष्ट्रात गेल्यानंतर ही बाब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालीन. देवेंद्र फडणवीस हे त्यांना समज देण्याचे काम योग्यप्रकारे करतील, अशी भावना केसरकर यांनी व्यक्त केली होती.
निलेश राणे यांचीही केसरकर यांच्यावर टीका
निलेश राणे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, दीपक केसरकर आपण 25 दिवसांपूर्वी कितील लाहान होतात हे स्वत:लाच विचारा. तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते असाल. आमचे नाही. त्यामुळे तोंड सांभाळून बोला. काही कारणांनी तुम्हाला इज्जत मिळते आहे. ती घ्यायला शिका. उगाचच वाट्टेल ते बोलू नका. तुमच्या संपूर्ण मतदारसंघाला माहिती आहे. नारायण राणे यांची मुले काय आहेत. अनेक नगरपरिषदा, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती आम्ही तुमच्याकढून हिसकावल्या आहेत. तुम्हाला थोडक्यात राजकीय जीवदान मिळाले आहे. नाहीतर तुमचा खेळ संपला होता. त्यामुळे आवरा स्वत:ला उगाचच काहीही बोलू नका. आगोदर ठरवून घ्या कोणाबद्दल बोलायचे आहे. काय बोलायचे आहे. अन्यथा तुम्हाला तुम्ही सांगाल त्या भाषेत उत्तर देण्याची आमची तयारी आहे. आम्ही गप्प बसणार नाही, असा ईशाराही निलेश राणे यांनी केसरकर यांना दिला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 13, 2022 09:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

