Theft at Azad Maidan Oath-Taking Ceremony: आझाद मैदानावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शपथविधी समारंभात 14 लाख रुपयांचे दागिने चोरी; 2 जणांना अटक

या दोन्ही आरोपींनी याआधी असेच गुन्हे केले आहेत. गिते हा घटनेच्या दिवशी आझाद मैदानात त्यांच्या मोबाईल टॉवरच्या लोकेशनवर हजर होते, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

Representational Image (Photo Credits: File Image)

Theft at Azad Maidan Oath-Taking Ceremony: 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या शपथविधी समारंभात 14 लाखांचे दागिने चोरणाऱ्या दोन आरोपींना आझाद मैदान पोलिसांनी (Azad Maidan Police) अटक (Arrest) केली आहे. चोरट्यांनी गर्दीत फायदा घेऊन 15 सोन्याच्या चेन आणि रोख रक्कम लंपास केली. अमोल बाबासाहेब गिते (28, रा. अहिल्यानगर) आणि सुमित रतन रंगारी (18, रा. नागपुर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींना नागपूरमधून अटक -

या आरोपींना नागपूरमधून अटक करण्यात आली असून, एका राजकीय कार्यक्रमात चोरीचा आणखी एक प्रयत्न करताना गिते याला घटनास्थळीच पकडण्यात आले होते. या दोन्ही आरोपींनी याआधी असेच गुन्हे केले आहेत. गिते हा घटनेच्या दिवशी आझाद मैदानात त्यांच्या मोबाईल टॉवरच्या लोकेशनवर हजर होते, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. (हेही वाचा -Goregaon Digital Arrest Scam: 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात ज्येष्ठ नागरिकांची 1.33 कोटींची फसवणूक; मुंबई येथील गोरेगाव परिसरातील घटना)

तथापी, दुसरा आरोपी रंगारी याला 23 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. दोन्ही आरोपींना आझाद मैदान पोलिस कोठडीत पाठवण्यात आले. अधिकारी अद्याप चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करू शकलेले नाहीत. आझाद मैदानावरील शपथविधीत 13 जणांनी 12.4 लाख रुपयांच्या सोन्याच्या चेन आणि वस्तू चोरीला गेल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. (हेही वाचा, How to Protect Yourself from Cyber Fraud: सायबर फसवणूक आणि गुन्हेगारांपासून कसे कराल स्वतःचे संरक्षण? जाणून घ्या खास टीप्स)

शपविधीदरम्यान 11 सोन्याच्या चेन चोरी -

या कार्यक्रमादरम्यान 11 सोन्याच्या चेन आणि 2 पर्ससह 12.4 लाख रुपये किमतीच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या होत्या. 5 डिसेंबरच्या संध्याकाळी झालेल्या या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अनेक मुख्यमंत्री, मंत्री, बॉलीवूड सेलिब्रिटी आणि देशभरातील हजारो नेते आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होते.