IPL Auction 2025 Live

Maharashtra Assembly Election Results 2024: माण-खटाव मतदार संघात तिसऱ्या फेरी अखेर जयकुमार गोरे आघाडीवर; प्रभाकर घार्गे पिछाडीवर

गोरे यांची दुसऱ्या फेरी अखेर6951 मताची आघाडी घेतली.

Photo Credit- X

Maharashtra Assembly Election Results 2024: माण-खटाव (Maharashtra Assembly Election)2019 मध्ये भाजपाकडून निवडणूक लढवताना माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या विरोधात फक्त 2955 मतांची आघाडी मिळवत पराभवाची नामुष्की गोरेंनी टाळली होती. लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात भाजपाचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा पराभव झाला असला तरी मतदारसंघातून नाईक निंबाळकर यांना 23 हजार 365 मतांची आघाडी मिळवून देण्यात गोरे यशस्वी ठरले होते.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना आमदार होऊच द्यायचं नाही यासाठी सर्वच पक्षातील प्रतिस्पर्धींनी शड्डू ठोकला असून त्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात भाजप, शिवसेना, रासप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वांनी पक्षाच्या विरोधात भूमिका ठेवण्याचा निर्णय घेत, यातून एक उमेदवार उभा करुन तो निवडून आणायचा असा ठराव केला.

किंगमेकर माजी आमदार कै. सदाशिवराव पोळ यांचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या माण मतदारसंघात आमदार जयकुमार गोरे यांनी आपली पकड मजबूत केली होती. २००९ अपक्ष, २०१४ काँग्रेस तर २०१९ भाजप अशा तीन वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवून जयकुमार गोरे यांनी विधानसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणली. यावेळी मात्र त्यांच्या चिन्हात बदल झाला नसून सलग दुसऱ्यांदा ते भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढत होते.