महाराष्ट्रात 'जनता कर्फ्यू' ची वाढविण्यात आली वेळ, उद्या सकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहणार ही मोहीम

राज्यात उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू कायम राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे

राजेश टोपे (Photo Credits-ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) शी दोन हात करण्यासाठी आज संपूर्ण देशभरात 'जनता कर्फ्यू' (Janta Curfew) ठेवण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ठेवलेल्या या मोहिमेला देशवासियांनी भरघोस प्रतिसाद दिला. आज ठेवण्यात आलेल्या जनता कर्फ्यू ची वेळ ही सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत ठेवण्यात आली होती. मात्र ही वेळ आता वाढवून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात ही वेळ उद्या सकाळी 5 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी संपूर्ण देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'जनता कर्फ्यू' ठेवला होता.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस ग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या कर्प्यूची वेळ वाढविली आहे. राज्यात उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू कायम राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्र राज्य लॉकडाऊन, कलम 144 लागू : उद्धव ठाकरे यांचं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन

भारतात कोरोना व्हायरस रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन हा आकडा 341 वर गेल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली ही आहे. ही खूप धक्कादायक बातमी असून अन्य देशांप्रमाणे आता भारतातील स्थिती देखील चिंताजनक बनत चालल्याचे चित्र यावरून दिसून येतय.

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारताचा आता अत्यंत कठीण काळ सुरू झाला आहे. यामध्ये कोरोना व्हायरस झपाट्याने वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. पूर्वी केवळ मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड या भागात लागू असलेले कलम 144 आता राज्यभर लागू करण्यात आल्या आहेत. मुंबई शहरामध्ये आज मध्यरात्रीपासून मुंबई लोकल बंद करण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवा देणार्‍यांना आता बससेवेचा फायदा घेता येणार आहे. अत्यावश्यक सेवामध्ये भाजीपाला, किराणा माल दुकानं, मेडिकल स्टोअर्स, आर्थिक व्यवहारांसाठी बॅंक आणि शेअर बाजार खुला राहणार आहेत. मात्र इतर खाजगी कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला देताना सरकारी कर्मचार्‍यांनी केवळ 5% उपस्थितीमध्ये कार्यालयं सुरू ठेवण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.