जम्मू-काश्मीर: बडगाम येथे हेलिकॉप्टर कोसळून महाराष्ट्रातील पायलट निनाद मांडवगणे यांचा मृत्यू
भोसला मिलिटरी स्कूलमध्ये पाचवी ते दहावीपर्यंतचे तर, ११ वी आणि १२ वीचे चे शिक्षण त्यांनी औरंगाबादच्या सैनिकी संस्थेत घेतले. पुढे त्यांनी बी. ई. मेकॅनिकल इंजिनीयरिंग पूर्ण करून हैद्राबाद ट्रेनिंग कमिशन मध्ये ट्रेनिंग पूर्ण केले. २००९ मध्ये ते एअर फोर्स मध्ये स्कॉड्रन लीडर पदावर सेवेत रुजू झाले.
जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) बडगाम येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात पायलट स्कॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे यांचा मृत्यू झाला. पायलट निनाद मांडवगणे (Ninad Mandavgane) हे मुळचे नाशिकचे (Nashik) होते. भोसला मिलिटरी स्कूलमध्ये पाचवी ते दहावीपर्यंतचे तर, ११ वी आणि १२ वीचे चे शिक्षण त्यांनी औरंगाबादच्या सैनिकी संस्थेत घेतले. पुढे त्यांनी बी. ई. मेकॅनिकल इंजिनीयरिंग पूर्ण करून हैद्राबाद ट्रेनिंग कमिशन मध्ये ट्रेनिंग पूर्ण केले. २००९ मध्ये ते एअर फोर्स मध्ये स्कॉड्रन लीडर पदावर सेवेत रुजू झाले. गुवाहाटी, गोरखपूर येथे कर्तव्य बजावल्यानंतर एक महिन्यापूर्वीच श्रीनगर येथे त्यांची बदली झाली होती. त्यानंतर हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचे निधन झाले.
निनाद यांच्या पश्चात पत्नी विजेता, दोन वर्षांची मुलगी, आई वडील आणि धाकटा भाऊ असे कुटुंब आहे. निनाद यांचे वडील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. ते बँक ऑफ इंडियामध्ये अभियंता होते. निनाद यांची आईही सेवानिवृत्त आहे. मांडवगणे दाम्पत्यांच्या दोन मुले आहेत. त्यापैकी निनाद हा मोठा मुलगा होता. तर, त्याच्याहीपेक्षा लहान असलेला मुलगा जर्मनीत सी. ए. पदावर सेवेत कार्यरत आहे. (हेही वाचा, भारताने पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडले)
निनाद हा औरंगाबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या (एसपीआय) २६ व्या कोर्सचा माजी विद्यार्थी होता. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याची निवड पुणे येथील एनडीएमध्ये झाली. इथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे तो पायलट झाला. दरम्यान, निनादच्या अशा आकस्मिक जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या जाण्याने आमचा आधार हरवला, अशी भावना त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. तर, नाशिकमध्येही निनादच्या आठवणींनी हळहळ व्यक्त केली जात आहे.