Viral Videos: जळगाव येथे साधुच्या वेशात हाती आलेल्या मनोरुग्णाने त्रिशुळ फेकुन पेट्रोल पंंपावरील कर्मचार्यावर केला हल्ला
जळगाव मध्ये एका मनोरुग्णाने साधुचा वेश धारण करुन पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर चक्क त्रिशुळ (Trishul) फेकत हल्ला केल्याची माहिती समोर येतेय.
जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातल्या जामनेर (Jamner) तालुक्यात अलिकडेच एक विचित्र, धक्कादायक असा प्रसंंग घडल्याचे समजत आहे. गाडेगाव परिसरात एका मनोरुग्णाने साधुचा वेश धारण करुन पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर चक्क त्रिशुळ (Trishul) फेकत हल्ला केल्याची माहिती समोर येतेय. माध्यमांंच्या माहितीनुसार, जनार्दन गंगाराम खोटे (Janardan Gangaram Khote) असे या मनोरुग्णाचे नाव असून या घटनेत पेट्रोल पंपावरील कर्मचारी गजानन निकम (Gajanan Nikam) हा गंभीर जखमी झाला आहे. भरदिवसा लोकांंच्या उपस्थितीत झालेला हा हल्ला इतका भीषण होता की काही वेळ तरी या मनोरुग्णाच्या जवळ जायला पण उपस्थित लोक घाबरले होते. या घटनेचा एक व्हिडिओ पेट्रोल पंंपवरच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला होता जो की आता फेसबुक सहित सर्वत्र तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर खाली दिलेली व्हिडीओ लिंंक नक्की तपासुन पाहा.
सदर प्रकार हा जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथे जळगाव औरंगाबाद महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंपावर घडल्याची माहिती मिळतेय, उपस्थितांंच्या माहितीन्वये जनार्दन गंगाराम खोटे हा व्यक्ती साधूच्या वेशात व हातात त्रिशूळ घेऊन बसलेला होता. सुरुवातीला अनेकांंनी हा खरोखरच कोणी साधु बाबा असल्याचे सुद्धा वाटले होते मात्र काही वेळाने जनार्दन हे रस्त्यावरुन येणार्या एका बाईक स्वाराच्या मागे त्रिशुळ मारायला धावत गेले, हा व्यक्ती घाबरल्याने पेट्रो पंंपाच्या बाजुला गेला आणि तेवढ्यात जनार्दन यांंनी आपल्या हातातील त्रिशुळ भिरकावुन पेट्रोल पंंप दिशेने टाकला. नेमका हा त्रिशुळ गजानन यांंना लागला आणि मग मात्र सर्वांंची हा कोणीतरी मनोरुग्ण आहे अशी खात्री पटली.
साधुच्या वेशातील मनोरुग्णाचा प्रताप (Video)
दरम्यान, जनार्दन यांंनी कर्मचार्याला जखम झाल्याचे पाहता ते भानावर आले आणि मग त्यांंनी घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी तत्परतेने जनार्दन यांंचा पिच्छा करत उपस्थितांंपैकी काहींंनी त्याला पकडले आणि चांंगला चोप दिला. सध्या जनार्दन हे पोलिसांंच्या ताब्यात आहेत, त्यांंचे वय साधारण 55 वर्ष असुन अद्याप तरी त्यांंच्या कुटुंंबाचा तपास लागलेला नाही.