Student Dies by Suicide in Matunga:माटूंगा येथील जय हिंद कॉलेजमधील विद्यार्थिनीची आत्महत्या, 14 मजली इमारतीच्या गच्चीवरुन उडी; मुंबई पोलिसांकडून तपास सुरु

मुंबईतील माटुंगा येथे जय हिंद महाविद्यालयाच्या एका 20 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. या प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Suicide | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबईतील (Mumbai News) माटुंगा (Matunga Incident) येथे मंगळवारी (1 जानेवारी) रात्री जय हिंद महाविद्यालयाच्या (Jai Hind College) 20 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या (Suicide Case) केल्याचे वृत्त आहे. ही घटना घटना टेक्नो हाइट्स या 14 मजली निवासी इमारतीत घडली, जिथे ती तिच्या कुटुंबासह आठव्या मजल्यावर राहत होती. प्राथमिक माहितीनुसार,पाठिमागील काही दिवसांपासून ही तरुणी नैराश्येत (Depression) होती. घटना घडली त्या रात्री तिचे दोन जवळचे मित्र तिस भेटण्यासाठी आले होते. ज्यामध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. या दोघांनी तीस समजावण्याचा प्रयत्न केला. बोलता बोलता ते तिघेही इमारतीच्या गच्चीवर आले. येथेही ते तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, संवाद सुरु असतानाच सदर मुलीने अचानक गच्चीवरुन उडी मारली.

खीडकीवर आपटून मग जीमनीवर

विद्यार्थिनीने  इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारल्यानंतर ती शेजारच्या इमारतीच्या खिडकीवर आपटली आणि नंतर खाली 15 फूट अंतरावर इमारतीच्याच आवारात पडली. मुलीच्या कृत्यानंतर तातडीने आपत्कालीन सेवांना संपर्क करण्यात आला. ज्यामुळे तिला तातडीने वैद्यकीय मदत पूरविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, आपत्कालीन सेवांनी तिस जागेवरच मृत घोषीत केले. (हेही वाचा, JEE Fail Student Dies By Suicide: 'आई-बाबा, मला माफ करा' जेईई परीक्षेत अपयश, इयत्ता आकरावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या)

पोलिस तपास सुरू

माटुंगा पोलिसांनी तातडीने कारवाई करत, मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदन तपासणीसाठी सायन रुग्णालयात पाठवला. अधिकाऱ्यांनी अपघाती मृत्यू अहवाल (ADR) नोंदवला आहे आणि या दुर्घटनेला कारणीभूत ठरणाऱ्या घटना निश्चित करण्यासाठी तिच्या दोन मैत्रिणींकडे चौकशी करत आहेत. दरम्यान, दोन्ही मैत्रिणी अजूनही धक्क्यातून सावरल्या नाहीत.  (हेही वाचा, JEE Aspirant: कोटामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच; बिहारमधील 16 वर्षीय विद्यार्थ्याची पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या)

संभाव्य कारण आणि मानसिक आरोग्य जागरूकता

विद्यार्थीनीच्या आत्महत्येस इतर अनेक कारणे असू शकतात, असा तर्क व्यक्त होतो आहे. दरम्यान, नेमकी कारणे शोधण्यासाठी पोलीस तपास सुरु आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांना मोठा धक्का बसला आहे आणि या दुर्घटनेचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी जय हिंद कॉलेजमध्ये शोक समुपदेशक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मानसिक आरोग्य व्यावसायिक नैराश्याने किंवा भावनिक त्रासाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना समुपदेशक, कुटुंब किंवा हेल्पलाइनकडून मदत घेण्याचे आवाहन करतात. जागरूकता वाढवणे आणि मानसिक आरोग्याबद्दल उघडपणे चर्चा करणे अशा दुःखद घटना टाळण्यास मदत करू शकते.

महिला आणि बाल हेल्पलाइन क्रमांक:

चाइल्डलाइन इंडिया: 1098; हरवलेली मुले आणि महिला: 1094; महिला हेल्पलाइन: 181; महिला हेल्पलाइनसाठी राष्ट्रीय आयोग: 112; राष्ट्रीय महिला आयोग हिंसेविरुद्ध हेल्पलाइन: 7827170170; महिला आणि ज्येष्ठ नागरिक पोलीस हेल्पलाइन: 1091/1291.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement