ISRO Successfully Launches PSLV-C54: पीएसएलव्ही- सी 54 रॉकेटसह 8 नॅनो उपग्रहांचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण; इस्त्रोच्या मोहीमेला मोठे यश

प्रक्षेपणासाठी सुरु झालेले काउंटडाऊन संपतातच 44.4 मीटर उंच रॉकेट (PSLV-C54) सतीश धवन प्रक्षेपण केंद्रावरुन (Satish Dhawan Space Centre) सकाळी 11.56 वाजता अवकाशात झेपावले.

ISRO- PSLV-C54 | (Photo Credits: Twitter)

पीएसएलव्ही- सी 54 (PSLV-C54) रॉकेट आणि इतर 8 रॉकेटचे अवकाशात यशस्वी उड्डाण झाल्याची माहिती भारतीय आंतराळ संस्था ( Indian Space Research Organisation) अर्थातच इस्त्रोने (ISRO ) शनिवारी (26 नोव्हेंबर) दिली. प्रक्षेपणासाठी सुरु झालेले काउंटडाऊन संपतातच 44.4 मीटर उंच रॉकेट (PSLV-C54) सतीश धवन प्रक्षेपण केंद्रावरुन (Satish Dhawan Space Centre) सकाळी 11.56 वाजता अवकाशात झेपावले.

प्रथ्वीवरुन उड्डाण घेतल्यानंतर हे रॉकेट अवकाशात निश्चित उंचीवर पोहोचले आणि पृथ्वी निरीक्षण उपग्रह म्हणजेच ओशनसॅट (Oceansat) रॉकेटपासून यशस्वीरित्या वेगळे झाले. त्यांना कक्षेत ठेवण्यात आल्याची माहती इस्त्रोचे अध्यक्ष एस सोमनात यांनी दिली आहे. दरम्यान, PSLV-C54 मध्ये पृथ्वी निरीक्षण उपग्रह (EOS-06) किंवा ओशनसॅटचा प्राथमिक पेलोड आहे आणि आठ सह-उपग्रह दोन तासांच्या कालावधीत सूर्याच्या समकालिक कक्षामध्ये ठेवली जाण्याची शक्यता आहे.

पृथ्वी निरीक्षण उपग्रह-6 हा ओशनसॅट (Oceansat series) मालिकेतील तिसऱ्या पिढीचा उपग्रह आहे. हे ओशनसॅट-2 अंतराळयानाच्या निरंतर सेवा प्रदान करण्यासाठी आहे. ज्यामध्ये वर्धित पेलोड तपशील तसेच अनुप्रयोग क्षेत्रे आहेत. (हेही वाचा, आंतराळात झेपावणार 8 नॅनो सॅटेलाइट आणि ओशनसॅट-3, इस्त्रोच्या या खास मोहिमेचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहा येथे)

ट्विट

आठ नॅनो उपग्रहांमध्ये भूतानसाठी इस्रो नॅनो सॅटेलाइट-2 (INS-2B), आनंद, अॅस्ट्रोकास्ट (चार उपग्रह) आणि दोन थायबोल्ट उपग्रहांचा समावेश आहे. INS-2B अंतराळयानामध्ये NanoMx आणि APRS-Digipeater असे दोन पेलोड असतील.

NanoMx हे स्पेस अॅप्लिकेशन सेंटर, अहमदाबाद यांनी विकसित केलेले मल्टी-स्पेक्ट्रल ऑप्टिकल इमेजिंग पेलोड असताना, APRS-Digipeater पेलोड माहिती तंत्रज्ञान विभाग आणि दूरसंचार-भूतान आणि U.R. राव सॅटेलाइट सेंटर, बेंगळुरू यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे.