IPS Hemant Nagrale नवे महाराष्ट्र पोलिस महासंचालक; Subodh Kumar Jaiswal यांच्यानंतर स्वीकारणार पदभार
हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार नगराळे हे दुसऱ्या क्रमांकावर येतात. त्यांच्या आधी संजय पांडे यांचा क्रमांक लागतो. मात्र संजय पांडे हे जून 2021 मध्ये सेवानिवृत होत आहेत.
New Maharashtra DGP: महाराष्ट्र पोलिस महासंचालक पदी सुबोधकुमार जैस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांच्यानंतर आता आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची वर्णी लागले आहे. नगराळे हे सध्या पोलिस महासंचालक विधी आणि तंत्रज्ञान चा भार सांभाळत होते. त्यासोबत आता त्यांना महाराष्ट्र पोलिस महासंचालक पद देण्यात आले आहे. हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. दरम्यान सुबोधकुमार जैस्वाल यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी जाण्याचा निर्णय घेतल्याने आता त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला आहे.
दरम्यान महाराष्ट्र पोलिस महासंचालक पदाच्या शर्यतीमध्ये सुरूवातीपासूनच हेमंत नगराळे यांच्या नावाची चर्चा होती. त्यांच्यासोबत या शर्यतीमध्ये संजय पांडे, रजनीश सेठ देखील चर्चेमध्ये होते.
ANI Tweet
हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार नगराळे हे दुसऱ्या क्रमांकावर येतात. त्यांच्या आधी संजय पांडे यांचा क्रमांक लागतो. मात्र संजय पांडे हे जून 2021 मध्ये सेवानिवृत होत आहेत. त्यामुळे नगराळे यांचं नाव आघाडीवर होते.
हेमंत नगराळे यांनी यापूर्वी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त पद भूषवलं आहे. त्यावेळेस मार्च 2018 मध्ये विधानपरिषदेची परवानगी न घेताच शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणं नगराळेंना भोवलं होतं. त्यावरून निलंबनाची देखील कारवाई झाली होती. तर याच कारकीर्दीमध्ये वाशीतील बँक ऑफ बडोदा दरोड्याची उकल अवघ्या दोन दिवसात करणं, 17 वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, पॉप गायक जस्टीन बिबरच्या कार्यक्रमात कायदा-व्यवस्था उत्तम ठेवल्याने त्यांना शाबासकीची थाप देखील मिळाली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)