IPL 2020, MNS On Disney-Hotstar: Amazon नंतर मनसेचा मोर्चा आयपीएलकडे, मराठी समालोचन पर्यायासाठी डिस्ने हॉटस्टारला इशारा

केतन नाईक यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, 'आय.पी.एल.क्रिकेट सामान्यांची कॉमेंट्री मराठीत करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही आवश्यक ते सहकार्य करू,पण नुसतीच चालढकल केलीत तर महाराष्ट्र सैनिकांशी गाठ आहे हे लक्षात असुद्या.'

Raj Thackeray | (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्षाने लक्षात आणून दिलेली बाब आणि मागणीची अॅमेझॉन (Amazon ) या ऑनलाइन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीने दखल घेतली. तसेच, त्याबाबत कार्यवाही करण्याचे अश्वासनही दिले. त्यानंतर मनसेने आता आपला मोर्चा इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल ( IPL ) या स्पर्धेकडे वळवले आहे. आपयपीएल स्पर्धेदरम्यान केल्या जाणाऱ्या समालोनामध्ये मराठीला ( Marathi Commentary) प्राधान्य देण्यात यावे. मराठी भाषेतही आयपीएल सामन्यांचे समालोचन व्हावे, असे पत्र मनसेने डिस्ने हॉटस्टार कंपनीला पाठवले आहे. मनसे कामगार सेना (Maharashtra Navnirman Sena) चिटणीस केतन नाईक (Ketan Naik) यांनी याबाबत ट्विटरद्वारे माहितीदिली आहे.

मनसेने डिस्ने हॉटस्टार कंपनीला पाठविलेल्या पत्रात चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. आयपीएल सामन्यांचे समालोचन हे सध्या हिंदी, इंग्रजी, तेलगु, कानडी आणि बंगाली भाषांमधून केले जाते, याकडे मनसेने लक्ष वेधले आहे. तसेच, आपल्या कंपनीचे प्रमुख कार्यालय मुंबई येथे आहे. शिवाय आयपीएलचा मोठा प्रेक्षक वर्ग हा मराठी आहे. त्यामुळे इतर भाषांप्रमाणे या सामन्यांचे समालोचन हे मराठीमधून केले जावे, अशा शब्दात मनसेने आपल्या पत्रात हॉटस्टार डिस्ने कंपनीला सुनावले आहे.

दरम्यान, आयपीएल 2020 हे पर्व संपण्यापूर्वीच कंपनीने मराठी भाषेत समालोचन उपलब्ध करुन द्यावे, अशी विनंती मनसनेने आपल्या पत्रात केली आहे. दरम्यान, त्यासोबतच कंपनीने जर वेळीच दखल घेऊन कार्यवाही केली नाही तर मात्र नाईलाजाने मनसेला प्रचलित पद्धतीने आंदोलन करावे लागेल. त्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवेल त्या सर्वाला आपण जबाबदार असाल, असा इशाराही मनसेने दिला आहे. (हेही वाचा, Amazon Responds To MNS: मनसे ठाम! अॅमेझॉन कंपनी संस्थापक जेफ बेजॉस यांनीही घेतली दखल)

दरम्यान, केतन नाईक यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, 'आय.पी.एल.क्रिकेट सामान्यांची कॉमेंट्री मराठीत करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही आवश्यक ते सहकार्य करू,पण नुसतीच चालढकल केलीत तर महाराष्ट्र सैनिकांशी गाठ आहे हे लक्षात असुद्या.'

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now