Mumbai NCB: अंमली पदार्थाचे आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त, 5 जणांना अटक; एनसीबीची कारवाई
या प्रकरणात कारवाई करत एनसीबीने पाच जणांना अटक केल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटने दिली आहे. एनसीबीने अधिक माहिती देताना सांगितले की, अत्यंत नियोजनबद्ध मोहीम राबवत ही कारवाई करण्यात आली.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने मोठी कारवाई करत अंमली पदार्थांचे आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. या प्रकरणात कारवाई करत एनसीबीने पाच जणांना अटक केल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटने दिली आहे. एनसीबीने अधिक माहिती देताना सांगितले की, अत्यंत नियोजनबद्ध मोहीम राबवत ही कारवाई करण्यात आली. NCB-मुंबईने आंतर-राज्य ड्रग सिंडिकेट यशस्वीरित्या मोडीत काढले आहे.
एनसीबी अधिकाऱ्यांनी कारवाई करत अंमली पदार्थांचे रॅकेट उद्ध्वस्त करताना 7 जणांना अटक केली. हे रॅकेट डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन घेऊन विक्री केल्या जाणाऱ्या औषधांच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे विक्री करणे आणि त्याचा अंमली पदार्सांठी वापर करण्यात गुंतले होते. एनसीबीने या कारवाईत 3,195 CBCS बाटल्या जप्त केल्या. त्यांच्याकडून काही वाहने आणि इतर दोषी कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. (हेही वाचा, IRS Officer Sameer Wankhede यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या अटकळांना उधाण; नागपूरच्या रेशीमबाग येथील RSS च्या मुख्यालयाला दिली भेट)
एनसीबीला मुंबई, ठाणे आणि लगतच्या भागात इतर प्रिस्क्रिप्शन ड्रग्ससह CBCS बाटल्यांची सक्रिय बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरुन एनसीबीने चौकशी सुरु केली. सापळा रचून शोध घेतला. या चौकशीत भिवंडी येथील इम्रान अस्लम देवकर नावाच्या व्यक्तीची ओळख पटली. जो अशा प्रकारच्या ड्रग्ज विक्रीत सहभागी होता. एनसीबीने हळूहळू, त्याच्या ठिकाणांबद्दल आणि त्याच्या कार्यपद्धतीबद्दल गुप्त माहिती गोळा केली गेली. दरम्यान, अधीक माहिती मिळाली की, सुरत येथील अंकिल जगदीशचंद्र खोलवडवाला नावाचा व्यक्ती इम्रान एडीला (इम्रान अस्लम देवकर) माल पुरवत होता. एनसीबीने या व्यक्तींवर पाळत ठेवली. ज्यामुळे नेकवर्कमध्ये सहभागी असलेल्या अनेकांची ओळख पटली.