Intercity Express To Start In Maharashtra: सीएसएमटी ते नागपूर, पुणे, गोंदिया, सोलापूर दरम्यान महाराष्ट्रात धावणार 'इंटरसिटी एक्सप्रेस'; 9 ऑक्टोबरपासून सुरुवात

यासोबत निश्चित तिकीट असले तरीही प्रवाशांना नियम आणि अटींचे पालन करावे लागणार आहे.

Indian Railway | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus), नागपूर (Nagpur), पुणे (Pune), गोंदिया (Gondia ) आणि सोलापूर (Solapur ) अशा पाच शहरांना जोडणऱ्या इंटरसिटी एक्सप्रेस (Intercity Express Start In Maharashtra) येत्या शुक्रवार (9 ऑक्टोबर) पासून महाराष्ट्रात सुरु होणार आहेत. मध्य रेल्वेने (Central Railway) आज (बुधवार, 7 ऑक्टोबर) ही माहिती दिली. मध्य रेल्वेने माहिती देताना म्हटले आहे की, 9 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातील पाच रेल्वे स्थानकांवरुन धावणाऱ्या या सर्व गाड्या विशेष (Special Trains) आणि राखीव गाड्या म्हणून धावतील.

मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ,नागपूर,पुणे, गोंदिया, आणि सोलापूर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांमधून केवळ तिकीट बुक केलेले आणि ज्यांच्याकडे निश्तिच तिकीट (Confirmed Tickets) प्रवासीच प्रवास करु शकणार आहेत. यासोबत निश्चित तिकीट असले तरीही प्रवाशांना नियम आणि अटींचे पालन करावे लागणार आहे. कोरोना व्हायरस (COVID19) संसर्गाचा धोका टाळण्यासाठी आपले गंतव्य स्थान आणि प्रवासादरम्यान SOP शी संबंधित नियमांचे पालन प्रवाशांना करावे लागणार आहे. (हेही वाचा, Mumbai Local Updates: पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून विरार- चर्चगेट- विरार मार्गावर 2 महिला विशेष रेल्वे फेर्‍या सुरू; इथे पहा वेळापत्रक)

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने नुकतीच घोषणा केली होती की, नागरिक आणि प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन लवकरच पुन्हा एकदा रेल्वे सेवा सुरु करण्यात येईल. असे असले तरी अद्याप त्याबाबत निर्णय झाल नाही. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये धावणाऱ्या लोकल रेल्वे अद्यापही स्थगितच आहेत. अत्यावश्य सेवा देणाऱ्या नागरिक, कर्मचाऱ्यांसाठी अपवाद म्हणून काही लोकल रेल्वे सोडल्या जात आहेत.

महाराष्ट्र सरकारने 31 ऑक्टोबर पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. परंतू, त्यात नियम आणि अटी घालून राज्यातील लॉकडाऊन काही प्रमाणात शिथीलही केला आहे. त्यानुसार राज्यातील आंतरजिल्हा बसवाहतूक, दुकाने, सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान, रेल्वेसेवा, मुंबई लोकल सेवा, शाळा महाविद्यालयं, धार्मिक आणि पर्यटन स्थळं अद्यापही बंद आहेत.