Indurikar Maharaj On Dhananjay Munde: इंदुरीकर महाराज म्हणतात 'धनंजय मुंडे यांना संत वामनभाऊ, भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त'
या ठिकाणी इंदुरीकर महाराज यांचे किर्तन सुरु होते. या वेळी धनंजय मुंडे यांनी किर्तनासाठी आलेल्या भक्त, श्रोत्यांमध्ये बसून किर्तनाचा अस्वाद घेतला. याच वेळी बोलताना इंदुरीकर महाराज यांनी मुंडे यांच्याबद्दल कौतुकाचे उद्गार काढले.
साधू, संतांचे आशीर्वाद प्राप्त झाले की माणूस मठा होतो. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे धनूभाऊ आहेत, असे उद्गार ह. भ. प. इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj ) यांनी काढले आहेत. तसेच, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना संत वामनभाऊ (Sant Wamanbhau), भगवानबाबा (Bhagawanbaba) यांचा आशीर्वाद प्राप्त झाला आहे, असेही इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे हे संत वामनभाऊ व संत भगवानबाबा यांच्या मंदिरात दर्शनासाठी आले होते. या मंदिरात इंदुरीकर महाराजही किर्तनासाठी मंदिरात आले होते. या वेळी ते बोलत होते. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि पार्श्वगायिका रेणू शर्मा यांच्यातील वाद हळूहळू निवळत असल्याचे समजते. रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. या आरोपांवरुन राज्यात राजकारण मोठ्या प्रमाणावर तापले होते.
प्राप्त माहितीनुसार, संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा मंदिरात धनंजय मुंडे दर्शनासाठी गेले होते. या ठिकाणी इंदुरीकर महाराज यांचे किर्तन सुरु होते. या वेळी धनंजय मुंडे यांनी किर्तनासाठी आलेल्या भक्त, श्रोत्यांमध्ये बसून किर्तनाचा अस्वाद घेतला. याच वेळी बोलताना इंदुरीकर महाराज यांनी मुंडे यांच्याबद्दल कौतुकाचे उद्गार काढले.
पार्श्वगायिका असलेल्या रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर राज्यभरात गदारोळ माजला होता. विरोधी पक्षात असलेल्या भाजपने मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हे आरोप गंभीर असल्याचे म्हणत प्रकरणाची दखल घेतली होती. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला नाही परंतू, काही काळ तशी स्थिती मात्र नक्कीच निर्माण झाली होती. (हेही वाचा, Pankaja Munde On Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांनंतर पंकजा मुंडे यांनी सोडलं मौन; वाचा काय दिली पहिली प्रतिक्रिया)
धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा हिने आरोप केल्यानंतर माजी आमदार आणि भाजप नेते कृष्णा हेगडे यांनीही रेणू शर्मा हिच्यावर ब्लॅकमेलिंगचा आरोप केला होता. त्यांनी तिच्याबाबत पोलिसात तक्रारही दिली होती. याशिवाय मनसे नेता मनिष धुरी यांनीही रेणूने आपल्याला ब्लॅकमेल केल्याचे म्हटले होते. याशिवाय विमानसेवेत काम करणाऱ्या एका अधिकाऱ्यानेही रेणूवर ब्लॅकमेलिंगचे आरोप केले होते. या सर्वाचा परिणाम धनंजय मुंडे यांना दिलासा मिळण्यात झाला. परिणामी वातावरण शांत झाले आणि धनंजय मुंडे यांचे मत्रिपद वाचले.
कोण आहे रेणू शर्मा?
धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर दिलेल्या माहितीनुसार, रेणू शर्मा ही करुणा शर्मा यांची बहिण आहे. करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे हे परस्पर संमतीने रिलेशनमध्ये होते. यातून त्यांन दोन मुले झाली. या मुलांना धनंजय मुंडे यांनी आपले नाव दिले आहे. तसेच, त्यांना कुटुंबातही स्थान दिले आहे. याची पूर्ण कल्पना पत्नी आणि कुटुंबीयांना आहे. परंतू, गेल्या काही दिवसांपासून करुणा आणि रेणू शर्मा याआपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचे मुंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते.