Indian Stock Markets Shut Today: देशभरात Eid al-Fitr Celebration; भारतीय शेअर बाजार राहणार बंद
देशभरात आज रमजान ईद (Eid al-Fitr) उत्साहात साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार (Indian Stock Markets) बंद राहणार आहे. आज सुट्टी घेतल्यानंतर उद्या म्हणजेच शुक्रवारी (12 एप्रिल) बाजार नेहमीप्रमाणे सुरु राहील.
देशभरात आज रमजान ईद (Eid al-Fitr) उत्साहात साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार (Indian Stock Markets) बंद राहणार आहे. आज सुट्टी घेतल्यानंतर उद्या म्हणजेच शुक्रवारी (12 एप्रिल) बाजार नेहमीप्रमाणे सुरु राहील. दरम्यान, शनिवार, रविवार या साप्ताहीक सुट्ट्या वगळता पुढच्या काही काळात शेअर बाजार आणखी दोन वेगवेगळ्या दिवशी बंद राहणार आहे. येत्या 17 एप्रिल आणि 1 मे असे हे दोन दिवस. या दोन्ही दिवशी अनुक्रमे रामनवमी आणि महाराष्ट्र दिन असणार आहे. उल्लेखनिय असे की, महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन एकाच दिवशी असतो. दरम्यान, देशभरात रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा केली जात आहे. दुसऱ्या बाजूला नागरिक परस्परांना ईदनिमित्त शुभेच्छाही (Eid al-Fitr Celebration) देत आहेत.
मधल्या काळात झालेल्या साधारण दुरुस्ती (करेक्शन) नंतर भारतीय शेअर बाजार मंगळवारी (9 एप्रिल) पुन्हा एकदा वधारताना दिसले. काहीशा लाल रंगात घसरण अनुभवल्यानंतर बाजार पुन्हा एकदा हिरव्या रंगासह वधारते आहे. विशेष उल्लेखनीय असे की, सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकाने 0.05% वाढ मिळवत नवा टप्पा गाठला. एक एप्रिलपासून सुरु झालेल्या नव्या आर्थिक वर्षात भारतीय शेअर बाजारात समभागांनी नव्याने गती घेतली असून त्यात वाढ होत आहे. (हेही वाचा, Eid-ul-Fitr Celebration In India: भारतामध्ये आज रमजान ईद चं सेलिब्रेशन; मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा!)
दरम्यान, बाजारातील गुंतवणूकदारांचे नव्या संकेतांकडे विशेष लक्ष असणार आहे. भारतीय किरकोशल चलनवाढीची नवी आकडेवारी शुक्रवारी जाहीर केली जाईल. तर दुसऱ्या बाजूला भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला हवामानाचा अंदाज आणि देलाल उष्णतेच्या लाटेचा इशारा याकडेही गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असणार आहे. देशातील किरकोळ चलनवाढ दोन ते सहा टक्क्यांच्या आसपास असल्याचे आरबीआयने एका माहितीमध्ये म्हटले आहे. चलनवाढीचा फेब्रुवारी महिन्यातील दर हा 5.09 टक्के होता. जगभरातील अनेक विकसीत देशांसाठी अशा पद्धतीची चलनवाढ ही अत्यंत चिंतेची बाब मानली जात आहे. असे असतानाही भारताना आपल्या चलनवाढीची समस्या यशस्वीरित्या हाताळली आहे. (हेही वाचा, Beggars On The Karachi Streets: रमजानच्या पार्श्वभूमीवर कराचीच्या रस्त्यांवर चार लाखांहून अधिक भिकारी जमले; शहरातील गुन्ह्यांमध्ये वाढ)
विदेशी गुंतवूकदार मोठ्या प्रमाणावर भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. ज्याचा सकारात्मक फायदा भारतीय गुंतवणूकदारांनाही होतो आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) च्या ताज्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की FPIs ने मार्चमध्ये 35,098 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. फेब्रुवारीमध्ये त्यांनी 1,539 कोटी रुपयांचा साठा खरेदी केला. एप्रिलमध्ये आतापर्यंत त्यांनी 10,117 कोटी रुपयांचा साठा खरेदी केला आहे, NSDL डेटा दर्शवितो.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)