प्रवाश्यांचा वेळ वाचणार, जनरल तिकिट ही मिळणार ऑनलाईन
तसेच प्रवाश्यांना या अॅपद्वारे ऑनलाईन पद्धतीने रेल्वेचे जनरल टिकीट उपलब्ध होणार आहे.
रेल्वे स्थानकावर रोजच्या रोज प्रवास करण्यापूर्वी टिकीटासाठी भल्या मोठया रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे प्रवाश्यांचे भल्या मोठ्या रांगेकडे पाहून वैतागतल्यासारखे त्यांचे चेहरे पाहायला मिळतात. मात्र आता प्रवाशांचा हा त्रास वाचवण्यासाठी रेल्वेने यूटीएस नावाचे अॅप लवकरच चालू करण्यात येणार आहे. तसेच प्रवाश्यांना या अॅपद्वारे ऑनलाईन पद्धतीने रेल्वेचे जनरल टिकीट उपलब्ध होणार आहे.
ऑनलाईन पद्धतीने टिकीट विकत घेण्याची योजना रेल्वे प्रशासनाने चार वर्षांपूर्वीच चालू केली होती. तर ही योजना प्रथम मुंबईत चालू केल्याने अन्य राज्यात याचा फारसा उपयोग करण्यात आला नाही. मात्र आता ऑनलाईन पद्धतीने जनरल डब्याचे तिकिट विकत घेण्यासाठी यूटीएस अॅप 1 नोव्हेंबर पासून सर्वांना तिकिट खरेदीसाठी चालू करण्यात येणार आहे. या अॅपचा वापर करणाऱ्या प्रवाशाला प्रथम रजिस्ट्रेशन करुन ऑनलाईन तिकिटाच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
परंतु या यूटीएस अॅपचा वापर करण्यासाठी प्रवाश्यांना रेल्वे स्थानकापासून जवळजवळ 25 ते 30 मीटर लांब उभे राहणे जरुरीचे आहे. तसेच या अॅपद्वारे एकावेळी चार तिकिटे विकत घेता येणार आहेत. तर रेल्वेस्थानकाचे तिकिट आणि महिन्याचा पाससुद्धा ऑनलाईन पद्धतीची सुविधा या अॅपमध्ये करुन दिली आहे.