Indian Railways Hikes Fare: रेल्वे प्रवाशांच्या खिशावरचा भार वाढला, पाहा किती वाढले तिकीट दर

रेल्वे तिकीट दर जर चढा राहिला तर रेल्वेने प्रवास करण्यास नागरिक प्राधान्य देणार नाहीत. परिणामी प्रवासादरम्यानची गर्दी कमी होईल. कोरोना नियंत्रणास मदत होईल, असा तर्क यामागे असल्याचे बोलले जात आहे. वाढीव तिकीट दराचा बोजा हा 30 ते 40 किलोमीटर पेक्षा अधिक प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पडणार आ

Indian Railways (Photo Credits: I File Image)

भारतात सर्वात स्वस्त प्रवास म्हणजे ट्रेन प्रवास. त्यामुळे दीर्घ पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी बहुतांश लोक हे ट्रेनचाच पर्याय निवडतात. हा पर्याय निवडत असलेल्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने (Indian Railways) रेल्वे प्रवास दरात वाढ (Indian Railways Fare) केली आहे. करोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे प्रवास दरात वाढ केल्याचे बोलले जात आहे. रेल्वे तिकीट दर जर चढा राहिला तर रेल्वेने प्रवास करण्यास नागरिक प्राधान्य देणार नाहीत. परिणामी प्रवासादरम्यानची गर्दी कमी होईल. कोरोना नियंत्रणास मदत होईल, असा तर्क यामागे असल्याचे बोलले जात आहे. वाढीव तिकीट दराचा बोजा हा 30 ते 40 किलोमीटर पेक्षा अधिक प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पडणार आहे.

भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आले आहे की, केवळ नव्या तिकीट दराचा परिणाम हा केवळ 3% रेल्वेंवर पडणार आहे. भारतीय रेल्वेने म्हटले की, कोविड प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये परिस्थिती अधिकच बिघडत आहे. त्यामुळे कोरोना काळात रेल्वे प्रवासादरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच, कोरोना नियंत्रणासाठी हे दर वाढविण्यात आले आहेत. रेल्वे ने म्हटले आहे की, रेल्वे प्रवाशाच्या प्रत्येक प्रवासावर रेल्वेला मोठे नुकसान सहन करावे लागते. प्रत्येक तिकीटावर अनुदान दिले जाते.

प्राप्त माहितीनुसार, रेल्वेना आकारलेले वाढीव प्रवास दर हे दीर्घ पल्ल्यांच्या मेल/एक्सप्रेस ट्रेनच्या धरतीवर त्याची आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता 30 ते 40 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही आता अधिक तिकीट दर भरावा लागणार आहे. कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी भारतीय रेल्वेला 22 मार्च 2020 पासून रेल्वे प्रवास थांबवावा लागणार होता.

भारतीय रेल्वे आपल्या प्रवासी दरात सातत्याने वाढ करत आहे. कोविडचा सामना करताना भारतीय रेल्वेने लॉकडाऊन पूर्वी साधारण 65% मेल/एक्सप्रेस ट्रेन आणि 90% पेक्षा अधिक उपनगरीय सेवांची दरवाढ केली आहे.