नवी मुंबई: पनवेल टर्मिनल्समधून धावणार 11 नव्या लांब पल्ल्याच्या गाड्या
तर मुंबईतील परेल आणि वांद्रे स्थानकामधूनही काही नव्या गाड्या सोडण्याचा विचार सध्या सुरू आहे.
भारतीय रेल्वे (Indian Railway) आता पनवेल स्थानकामधून (Panvel terminus) 150 खाजगी गाड्या देशभरातील 100 विविध चालवण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यापैकी 11 गाड्यांसाठी अप आणि डाऊन मार्गासाठी पनवेलमध्ये सुरूवात किंवा शेवटचा थांबा देण्यात येणार आहे. तर मुंबईतील परेल आणि वांद्रे स्थानकामधूनही काही नव्या गाड्या सोडण्याचा विचार सध्या सुरू आहे.
नवी मुंबई मधील पनवेल रेल्वेस्थानक आता लवकरच अपग्रेड केलं जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पनवेल स्थानकामध्ये आता 3 नव्या प्लॅटफॉर्मची उभारणी केली जाणार आहे. तर कळंबोलीमध्ये नवा मेंटनंस डेपो उभारला जाणार आहे. मुंबईतील वर्दळ पाहता त्यावरील भार थोडा हलका करण्यासाठी आता नवी मुंबईमध्ये पनवेल स्थानकातून काही गाड्या सोडण्याचा विचार केला जात आहे.
पनवेल स्थानकामधून कोणत्या गाड्या चालवल्या जाऊ शकतात?
चारपल्ली - पनवेल
पनवेल - औरंगाबाद
पनवेल - चैन्नई
पटना - पनवेल
अलहाबाद - पनवेल
कलबुर्गी - पनवेल
पनवेल - अंजनी
पनवेल-मडगाव
पनवेल - कानपूर
परेल- कोल्हापूर
परेल - शिर्डी
वांद्रे - अकोला
वांद्रे- दिल्ली
वांद्रे - अलाहाबाद
दरम्यान अहमदाबाद - मुंबई दरम्यान दुसरी खाजगी तेजस एक्सप्रेसधावणार आहे. या ट्रेनला 17 जानेवारीला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे.