पुण्यातील कोरोनाग्रस्तांवर होणार प्लाझ्मा थेरपी; भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून परवानगी
महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) शहरात आढळून आले आहेत
महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) शहरात आढळून आले आहेत. यामुळे पुण्यातील नागरिकांमध्ये घबराच पसरली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी पुण्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. यातच पुणेकरांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. पुण्यातील कोरोनाग्रस्तांवर प्लाझ्मा थेरपीचा (Plasma Therapy) उपचार करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (Indian Council of Medical Research) परवानणी दिली आहे.
प्लाझ्मा थेरेपी हा काही कोव्हिड-19 वरचा उपाय नाही. मात्र शेवटच्या स्टेजमध्ये असलेल्या रुग्णांना वाचविण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरिरात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. त्याचा उपयोग कोरोनाविरुद्ध करण्यासाठी जी पद्धत आहे त्यालाच प्लाझ्मा थेरेपी, असे म्हटले जाते. आपला प्लाझ्मा दान करण्यासाठी 35 जणांनी इच्छ व्यक्त केली आहे. त्यांच्याशी संपर्क करून पुढच्या एक दोन दिवसांमध्ये याचा प्रयोग करण्यात येणार आहे. रक्तामधून प्लाझ्मा वेगळा करण्यासाठी पुण्यात मशिनही घेण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीचा उपचार करण्यास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने परवानगी दिली आहे. हे देखील वाचा- Corona Update In India Today: भारतात कोरोना विषाणूचा हाहाकार; देशात आज 2 हजार 487 नव्या रुग्णांची नोंद तर, एकूण 83 जणांचा मृत्यू
कोरोना विषाणूने पुण्यात पाऊल ठेवत महाराष्ट्रात शिरकाव केला होता. त्यानंतर हळूहळू मुंबई, नागपूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आले. सध्या पुणे रेड झोनमध्ये आहे. अनेक वसाहतींना कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्लाझ्मा थेरपी करोनाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरत असल्याचे वैद्यकीय पाहणीतून समोर आले होते. त्यामुळे आयसीएमआरने ही थेरपी उपचारासाठी वापरण्यास सुरूवात केली. देशातील अनेक ठिकाणी ही थेरपी वापरली जात असून मुंबईत प्लाझ्मा थेरपी यशस्वी ठरली आहे
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)