Dengue Chikungunya Cases Increase in Mumbai: साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ; डेंग्यूचे 1013 रुग्ण, चिकनगुन्याचे 164 रुग्ण, लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्येही वाढ
मुंबईमध्ये जून व जुलैमध्ये आवाक्यात असलेल्या चिकुनगुन्याच्या रुग्णांमध्ये ऑगस्टमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये मुंबईमध्ये चिकुनगुन्याचे 164 रुग्ण सापडले.
Dengue Chikungunya Cases Increase in Mumbai: मुंबईत पावसाळा (Monsoon illnesses)सुरु झाला की, साथीचे आजार डोकं वर काढतात. ऑगस्टमध्ये मुंबईत साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यीच माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे ऑगस्टच्या तुलनेत जून आणि जुलैमध्ये पाऊस जोरदार होता. तरी साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली नव्हती. मात्र, ऑगस्टमध्ये हिवताप, डेंग्यू(Dengue), चिकूनगुन्या व लेप्टोच्या (Leptospirosis)रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. चिकूनगुन्याचे 164 रुग्ण आढळले आहेत. स्वाईन फ्लू व कावीळच्या रुग्णांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. राज्यात गेल्या ऑगस्टपर्यंत डेंग्यूमुळे 14 जणांचा मृत्यू झाला होता. (Maharashtra Rain Update: बीडमध्ये पावसाचा धुमाकूळ; नद्यांवरील पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला)
मुंबईप्रमाणे राज्यातही चिकुनगुन्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबईमध्ये जून व जुलैमध्ये आवाक्यात असलेल्या चिकुनगुन्याच्या रुग्णांमध्ये ऑगस्टमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये मुंबईमध्ये चिकुनगुन्याचे 164 रुग्ण सापडले असून, राज्यामध्ये 1123 इतके रुग्ण सापडले आहेत.
मुंबईत हिवतापाचे 1171 रुग्ण, डेंग्यूचे 1013 रुग्ण, लेप्टोचे 272 रुग्ण, चिकूनगुन्याचे 164 रुग्ण, कावीळ 169 आणि स्वाईन फ्लूचे 170 रुग्ण सापडले आहेत. जुलैमध्ये स्वाईन फ्लूने अचानक डोके वर काढले. जुलैमध्ये जोरदार झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना वाढल्या. परिणामी साचलेल्या पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागला. त्यामुळे त्या काळात लेप्टोचे रुग्णांमध्ये वाढ झाली. त्यामुळे हिवताप, डेंग्यूपाठोपाठ लेप्टो व स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. मात्र ऑगस्टमध्ये अधूनमधून होत असलेला पाऊस व वाढते ऊन यामुळे हिवताप, डेंग्यू व लेप्टोच्या रुग्णांबरोबरच चिकुनगुन्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.