COVID Intranasal Vaccine Update: मुंबईकर ज्येष्ठ नागरिकांना आजपासून नाकावाटे मिळणार कोरोनाची इन्कोव्हॅक लस; घ्या जाणून

आजवर दिल्या गेलेल्या कोराना प्रतिबंधक लसींच्या मात्रा या शरीरात सुई टोचून दिल्या आहेत. इन्कोव्हॅक ही कोविड प्रतिबंधात्मक भारतातील पहिलीच लस आहे जी, नाकावाटे दिली जात आहे. या लसीला Intra-Nasal Covid Vaccine असे म्हटले जाते.

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

Mumbai iNCOVACC Vaccine Update : राज्यातील कोरोना संक्रमीतांची संख्या मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झाले आहे. त्यामुळे लसीकरणावरही पुन्हा एकदा भर दिला जात आहे. दरन्यान, आता मुंबईतील नागरिकांना नाकावाटे दिली जाणारी कोरोना लस उपलब्ध झाली आहे. सध्यास्थितीत तरी ही लस ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणार असल्याचे समजते. मुंबई महापालिकेच्या सुमारे 24 प्रभागांमधील निवडक केंद्रांवर इन्कोव्हॅक (iNCOVACC) ही नाकावाटे लस दिली जाणार आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, जेष्ठ नागरिकांना दिली जाणारी इन्कोव्हॅक (iNCOVACC BBV154) ही नाकावाटे दिली जाणारी लस मोफत उपलब्द करुन दिली जाईल. ही लस भारत बायोटेकची निर्मिती आहे. ही लस मुंबईतील कोणकोणत्या केंद्रांवर उपलब्ध होईल याची एक यादीच पालिका केंद्रावर जारी करण्यात आली आहे. यादीनुसार मुंबईतील सुमारे 24 प्रभागांमध्ये असलेल्या लसीकरण केंद्रावर ही लस सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत उपसब्द असणार आहे.

इन्कोव्हॅक या लसीचे वैशिष्ट्य असे की, ही लस नाकाद्वारे दिली जाते. आजवर दिल्या गेलेल्या कोराना प्रतिबंधक लसींच्या मात्रा या शरीरात सुई टोचून दिल्या आहेत. इन्कोव्हॅक ही कोविड प्रतिबंधात्मक भारतातील पहिलीच लस आहे जी, नाकावाटे दिली जात आहे. या लसीला Intra-Nasal Covid Vaccine असे म्हटले जाते. (हेही वाचा, COVID 19 Vaccine In India: महाराष्ट्र सरकार वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर Bharat Biotechकडून विकत घेणार 2 लाख लसींचे डोस)

मुंबई महनगरपालिकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य लस देण्यात येणार आहे. मुंबई पालिकेच्या 24 वॉर्डांमधील निवडक केंद्रांवर भारत बायोटेकची इन्कोव्हॅक (iNCOVACC BBV154) नाकावाटे दिली जाणारी लस उपलब्ध असणार आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे या केंद्रांची यादी जारी करण्यात आली आहे. 24 वॉर्डांमध्ये प्रत्येकी एक लसीकरण केंद्र असेल. नोंदणी जागेवरच होईल आणि लसीकरण केंद्रे सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत सुरू राहतील. इन्कोव्हॅक ही नाकातून (सुईशिवाय) दिली जाणारी जगातील पहिली कोविड लस आहे.

कोरोना, किंवा कोविड-19, हा नवीन कोरोनाव्हायरसमुळे होणारा एक अत्यंत संसर्गजन्य श्वसनाचा आजार आहे. डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहानमध्ये या विषाणूची प्रथम ओळख झाली आणि त्यानंतर तो जगभरात पसरला, परिणामी साथीचा रोग झाला.

जेव्हा संक्रमित व्यक्ती बोलतो, खोकतो किंवा शिंकतो तेव्हा COVID-19 प्रामुख्याने श्वसनाच्या थेंबांद्वारे पसरतो. COVID-19 ची लक्षणे सौम्य ते गंभीर स्वरुपात बदलू शकतात. यात ताप, खोकला, थकवा, चव किंवा वास कमी होणे आणि श्वास लागणे यांचा समावेश असू शकतो. काही लोकांना न्यूमोनिया सारखी गंभीर लक्षणे देखील दिसू शकतात, जी जीवघेणी असू शकतात.

COVID-19 विरूद्ध प्रतिबंधात्मक उपायांमध्ये स्वच्छता ठेवणे. जसे की नियमितपणे हात धुणे, मास्क घालणे आणि सामाजिक अंतर यांचा समावेश होतो. COVID-19 चा प्रसार रोखण्यासाठी लस देखील विकसित केल्या गेल्या आहेत आणि त्या जागतिक स्तरावर दिल्या जात आहेत.

साथीच्या रोगाचा जगावर लक्षणीय परिणाम झाला आहे, अनेक देशांनी व्हायरसचा प्रसार कमी करण्यासाठी लॉकडाउन आणि इतर उपाय लागू केले आहेत. साथीच्या रोगाचा जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. अनेक व्यवसाय आणि उद्योगांना आर्थिक अडचणी येत आहेत. COVID-19 साथीचा रोग सतत विकसित होत आहे आणि जगभरातील शास्त्रज्ञ आणि आरोग्य अधिकारी व्हायरस अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि प्रभावी उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय विकसित करण्यासाठी काम करत आहेत.