गोकुळ दूध संघावर आयकर विभागाचा छापा, सहकार क्षेत्रात खळबळ

मात्र, गेले तीन महिने गाईच्या दूधात मोठी घट झाली आहे. त्यामुळे संघाला तोटा सहन करावा लागतो आहे. हा तोटा सुमारे 90 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे करभरणा कमी होत असल्याचे संघाने म्हटले होते. मात्र, संघाने दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे आयकर विभागाने म्हटले होते.

Gokul Dudh Sangh | (Photo credit: archived, edited, symbolic images)

पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी संस्थांमध्ये आणि महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायामध्ये मोठे नाव असलेल्या गोकुळ दूध संघाच्या कोल्हापूर (Kolhapur) येथील मुख्य कार्यालयावर आयकर विभागाने (Income Tax Department) अचानक छापा टाकल्याने सहकार क्षेत्रात (co-operative secto)  एकच खळबळ उडाली आहे. ही धाड नेमकी कोणत्या कारणासाठी टाकण्यात आली याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, गोकुळने कर चुकवेगिरी केल्याने प्रकरणी हा छापा टाकण्यात आला असावा असे सांगितले जात आहे. या कारवाईत आयकर विभागाच्या पथकाने गोकूळ दूध संघ (Gokul Dudh Sangh) कार्यालयात सुमारे 4 तास कसून चौकशी केली. तसेच, आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांचीही तपासणी केली.

गोकुळ वर छापा टाकल्याची संभाव्य कारणे

(हेही वाचा, देशातील पहिला प्रयोग: आता अमूल विकणार बाटलीबंद उंटीनीचे दुध; पाहा काय आहे किंमत)

दरम्यान, करभरणा कमी होत असल्याबद्दल आयकर विभागाने गोकुळ कडे यापूर्वीच विचारणा केली होती. मात्र, गेले तीन महिने गाईच्या दूधात मोठी घट झाली आहे. त्यामुळे संघाला तोटा सहन करावा लागतो आहे. हा तोटा सुमारे 90 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे करभरणा कमी होत असल्याचे संघाने म्हटले होते. मात्र, संघाने दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे आयकर विभागाने म्हटले होते. कदाचित त्यामुळेच कागदपत्रे आणि इतर तपशील जाणून घेण्यासाठी आयकर विभागाने हा छापा टाकला असावा असे बोलले जात आहे.