Pune Dam Water Level : संततधार पावसामुळे पुण्यातील धरणांमधला पाणीसाठा वाढला; ताजी आकडेवारी आली समोर
या संततधार पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठा वाढला आहे.
Pune Dam Water Level : राज्यात मान्सून सुरू झाल्यापासून सर्व दूर पावसाची संततधार पहायला मिळत आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रात मागील आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरु आहे. या संततधार पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठा वाढला आहे. हा पाणीसाठा दोन टीएमसीने वाढला आहे. त्यामुळे गेल्या काहीकाळ पाणी कपातीला सामोर गेलेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (हेही वाचा:Vidharbha Weather Update: विदर्भात पावसाने दडी मारल्याने पाण्याचे संकट, ठिकठिकाणी पेरण्या खोळंबल्या )
किती पाणीसाठा वाढला
मान्सून आधी पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धराणात एक महिना पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. काही दिवसांपूर्वी या चारही धरणात ३.५० टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली होती. त्यानंतर कोसळलेल्या पावसामुळे बुधवारी चार धरणांचा पाणीसाठा ४.९९ टीएमसी झाला होता. त्यानंतर आज रविवारीपर्यंत पाणीसाठा हा ५.८७ इतका झाला आहे.
खडकवासला धरण साखळी क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसांची संततधार सुरु आहे. यामुळे गेल्या सहा दिवसांत खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील पाणीसाठा 2 टीएमसीने वाढला आहे. खडकवासला धरण टेमघर, वरसगाव,पानशेत, खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला आहे.
कमी पाणीसाठ्यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चारही धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. त्यात पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.